येवला : येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयात सुवर्णपदक विजेत्या दोन कर्णबधिर मुलांचा खास सत्कार समारंभ अजित चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते.साने गुरुजी यांनी लिहिलेल्या खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना म्हणजे माणुसकीला आलेला गहीवर असल्याचे प्रतिपादन अजित चव्हाण यांनी केले. अपंगांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचे काम म्हणजे त्यांच्या पंखात बळ पेरून त्यांना आकाशात उंच भरारी घ्यायला लावण्याचे हे कार्य अतुलनीय असल्याचे गौरवाद्गार चव्हाण यांनी काढले.समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी या विशेष मुलांच्या शाळेचा २३ वर्षाचा अहवाल सादर केला. कार्यक्र मास अंकुश शिरसाठ, मच्छींद्र पवार, दिनकर दाणे, रामनाथ पाटील, कानिफनाथ मढवई, सुधाताई पाटील, सलील पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन सुकदेव आहेर यांनी केले तर दिनकर दाणे यांनी आभार मानले.
मायबोली विद्यालयातील सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 1:20 AM
येवला : येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयात सुवर्णपदक विजेत्या दोन कर्णबधिर मुलांचा खास सत्कार समारंभ अजित चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते.
ठळक मुद्देसुवर्णपदक विजेत्या दोन कर्णबधिर मुलांचा खास सत्कार