नाशिक : २०१७ साली दक्षिण आफ्रिकेतील आयर्नमॅन स्पर्धा जिंकत नाशिक शहरात पहिला किताब मिळवणाऱ्या अम्मर मियाजी या साहसी क्रीडापटूचा दाऊदी बोहरा संप्रदायाच्या दावत ए हदीया, मुंबई आणि अंजूम ए हकिमी, नाशिक या धर्मादाय संस्थांच्या वतीने धर्मगुरू अल हद मुसताली भाईसाब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़यावेळी धर्मगुरू अल हद मसताली भाईसाब यांनी, अम्मर मियाजी सारखे साहसी खेळाडू बोहरा समाजाचे नाव जगभरात खेळाद्वारे पोहोचवत आहेत, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी शब्बीर नासिकवाला, प्रवीणकुमार खाबिया यांनी मनोगत व्यक्त केले तर अम्मर मियाजी यांनी सत्काराला उत्तर दिले़कुत्बी मशीद कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी प्रो-कबड्डीतील यु-मुंबा संघाचे खेळाडू, छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू सचिन गलांडे, भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, मुस्तफा टोपीवाला, डॉ. पिंप्रीकर, आयआॅन स्पोर्ट्सच्या दीपाली सोनवणे, अम्मर मियाजी यांचे स्विमिंग प्रशिक्षक विलास इंगळे, क्र ीडा आहारतज्ज्ञ श्रेया आढाव, एन. सी. देशपांडे, विजय काकड, राहुल रायकर, प्रमोद उटे आदी उपस्थित होते.आयर्नमॅन अर्थात स्पर्धेत खेळाडूला एकूण चाळीस किलोमीटर पोहणे, अठराशे किलोमीटर सायकलिंग आणि ४२५ किलोमीटर धावणे एवढे खडतर आव्हान केवळ दहा दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचे असते.
आयर्नमॅन अम्मर मियाजी यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:17 AM