नाशिकरोड : खेळामुळे शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिकदृष्ट्या बलवान होण्याची क्रिया घडत असल्याने खेळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अरुण स्वादी यांनी केले. नाशिकरोड इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या असोसिएशन सभासदांच्या सत्काराप्रसंगी डॉ. स्वादी बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जाधव हे होते. वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते डॉ. गिरीश घन, रौप्यपदक- डॉ. सुनील वर्तक, दुहेरी बॅडमिंटन सुवर्णपदक - डॉ. शिरीष घन, डॉ. सतीश पापरीकर, रौप्यपदक - डॉ. सुनील वर्तक, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभय ढवळे तसेच २१ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक विजेत्या डॉ. राजश्री पाठक, रौप्यपदक- डॉ. मनोहर जाधव व खुल्या महिला मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक विजेते डॉ. श्वेता भिडे, डॉ. राजीव पाठक, डॉ. रमेश निमसे, डॉ. समीर भिडे, डॉ. विशांत घोडके, बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक विजेते डॉ. हेमंत जोशी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच विदेशात संधिवात पदव्युत्तर पदवी मिळवलेले डॉ. प्रवीण जाधव यांचादेखील सत्कार करण्यात आला. आभार डॉ. माधुरी जाधव यांनी मानले. (प्रतिनिधी)
नाशिकरोड आयएमए सदस्यांचा सत्कार
By admin | Published: October 20, 2016 2:14 AM