सातपूर : शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या महानगरपालिकेच्या जिजामाता शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सातपूर कॉलनीतील शाळा क्र मांक २८ मध्ये आयोजित कार्यक्र मात शाळा क्र मांक २७ आणि २८ मधील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग सभापती योगेश शेवरे, नगरसेवक सीमा निगळ, दीक्षा लोंढे, मनपा शिक्षण अधिकारी नितीन उपासनी आदी उपस्थित होते. गुणवत्ता यादीत आलेल्या जान्हवी पाटील, प्रियंका पाटील, संस्कृती कुंभार, रिशू पंडित यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. वर्गशिक्षक पल्लवी शेवाळे, सुरेश चौरे, योगेश सूर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक केंद्रप्रमुख रोहिदास गोसावी यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक नितीन देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी केले. सुनेत्रा तांबट, यशवंत जाधव यांनी आभार मानले. यावेळी सचिन चिखले, वैभव आहिरे, रेगजी वसावे, सोनिया बोरसे, भारती पवार, पुनाजी मुठे, सुरेश चौरे, दत्तात्रय शिंपी, अनिल चव्हाण, कविता शिरोडे आदींसह पालक उपस्थित होते.
शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:00 AM