ठळक मुद्देयापुढे जाऊन अल्ट्रा स्पाईस रेस गोवा-उटी-गोवा ही १७५० किमीची स्पर्धा फक्त ९५ तासात पहिल्या क्र मांकाने पूर्ण करून एक नवीन विक्र म स्थापित करणाºया लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांच्यासह इतर सायकलपटूंना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. लायन्
नाशिक : यंदाच्या वर्षी आजपर्यंत झालेले सुपर रॅण्डोनियर यांचे तसेच बीआरएम १२०० किमीची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सायकलस्वारांचेदेखील मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्र मास सुरु वात झाली.यावेळी नाशिक जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, डॉ. हितेंद्र महाजन, महेंद्र महाजन, नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, अमर मियाजी, चंद्रकांत नाईक, डॉ. आबा पाटील, देविंदर भेला, मोहन देसाई, रवींद्र दुसाने, नितीन कोतकर, डॉ. मनीषा रौंदळ, नीता नारंग यांच्यासह अनेक सायकलिस्ट उपस्थित होते.