मनमाड: पुणे मनमाड बसमधील चित्रा पवार रा: पिंपरखेड या महिला प्रवाशाला प्रसुती वेदना जाणउ लागल्यानंतर बस चालक व वाहकाने येवला येथील ग्रामिण रुग्णालयात महिलेला दाखल करण्यासाठी नेत असताना बस मधेच महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला.मनमाड आगारामधे माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या चालक डी.पी. जाधव व वाहक पी. एच. बढे यांचा सत्कार करण्यात आला.मनमाड आगारातील चालक व वाहक सामाजीक बांधीलकी जोपसण्याच्या भावनेतून सेवा करत असल्याची बाब गौरवास्पद असल्याचे आगार व्यवस्थापक प्रितम लाडवंजारी यांनी भाषणातून सांगीतले. या वेळी आगारातील वाहक, चालक व कर्मचारी उपस्थित होते.
मनमाड आगारात चालक व वाहकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 6:38 PM