पेठ : ग्रामीण व अतिदुर्गम अशा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव खुर्द या गावातील एका गरोदर महिलेला होणाºया वेदना, नातेवाइकांचा जीव टांगणीला, एकीकडे नवीन पाहुणा जन्माला येणार याची ओढ तर दुसरीकडे कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसतांना बाळांतपण कसे करावे या विवंचनेत असलेले नातेवाईक. अशातच गावातील सुशिक्षितांना शासनाच्या १०८ क्रमांकाची आठवण झाली. आणी लगेचच नंबर डायल.इकडे हरसूल ग्रामीण रु ग्णालयाला याची माहिती मिळते. आणी १०८ नंबर जातेगावकडे वैद्यकिय अधिकारी, परिचारिका व आवश्यक औषधसाठ्याासह जातेगावकडे झेपावते. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून वैद्यकिय अधिकाºयांनी रु ग्णवाहिकेतच महीलेची यशस्वी प्रसूती केली आणी सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.हरसुल ग्रामीण रु ग्णालय अंतर्गत असलेली १०८ या रु ग्णवाहिका वर रु ग्णसेवा बजावणारे वाहनचालक गौरव चौधरी व वैद्यकिय अधिकारी डॉ निलेश कळमनकर यांना नेहमी प्रमाणे रु ग्ण घेण्यासाठी जातेगाव येथून बोलावणे आले . लागलीच जातेगाव येथे रुग्णवाहीका दाखल झाली .या वेळी गरोदर असलेल्या मनीषा अशोक लोखंडे या महीलेला वेदना सुरु झाल्याने तिला तात्काळ हरसुल ग्रामीण रु ग्णलयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वेदना सहन होत नसल्याने डॉ कळमकर यांनी महीले सोबत असलेल्या आशा सेवीका संगीता सोमनाथ वाघेरे यांना व गरोदर महीलेच्या नातेवाईकांना आणि चालक गौरव चौधरी यांना मदतीला घेऊन रस्त्यातच रु ग्णवाहिका थांबवून अवघड असलेले बाळंतपण रु ग्णवाहिकेमध्ये केले. नवजात बाळाचे सव्वा किलो वजन होते . सुखरूप झालेल्या नवजात बालकासह मातेला नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रु ग्णलयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. राज्य शासनाने चालू केलेल्या या रु ग्णवाहिकेचा मूळ उद्देश सफल होत असल्याने ग्रामस्थ खºया अर्थाने आनदीत होत आहे. तर जातेगावच्या ग्रामस्थांसह सरपंच कल्पना तरवारे यांनी १०८ रु ग्णवाहिके वरील चालक गौरव चौधरी व डॉ निलेश कलमनकर याचे आभार मानले.
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमध्ये महिलेची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 12:42 AM