घोटी : गेल्या १५ दिवसांपूर्वी खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारात एका बालिकेवर व त्यानंतर आठवड्यात रस्त्याने घरी जाणाऱ्या इसमावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल चार पिंजरे लावण्यात आले होते. मात्र, बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नव्हता. अखेर आज तब्बल १५ दिवसांनी मंगळवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास मादी बिबट्या तीन नंबरच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली.मंगळवारी पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाल्याचे समजताच वनविभागाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अद्यापही या परिसरात आणखी एखादा बिबट्या वावरत असावा, अशी शक्यता परिसरातील नागरिक व्यक्त करीत भीतीच्या दडपणाखालीच दिसत आहेत.-----------------पंधरा दिवसांपूर्वी भैरवनाथ मंदिराजवळच्या एका वाडीतील बालिका आपल्या आजोबांसमवेत घरी जात असताना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याने झडप घालून बालिकेस गंभीर जखमी केले होते. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात वनविभागाने प्रारंभी दोन पिंजरे लावले होते. मात्र, बिबट्या फिरकत नसल्याने वनविभाग चिंतेत असताना आठ दिवसांनी याच परिसरात पुन्हा एका ४५ वर्षीय इसमावर बिबट्याने झडप घालून त्यालाही गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर मात्र वनविभागाचे तालुका परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी दोन असे चार पिंजरे परिसरात लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम आखली होती. मात्र, तरीही बिबट्या पिंजऱ्याकडे न फिरकता हुलकावणी देत असल्याने वनविभागही हतबल ठरला होता. अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास कोंबड्यांची शिकार करण्याच्या मोहात बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली.बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ढोमसे, वनपाल दत्तू ढोन्नर, खाडे, श्रीमती पाठक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सुटकेचा निःश्वास सोडला.--------------------अद्यापही या भागात आणखी एखादा बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त होत असून बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना शासनाने तात्काळ आर्थिक साहाय्य करण्याची मागणी केली जात आहे. त्याबरोबरच दौंडत व उभाडे येथील वाडीतही गेल्या चार दिवसांपासून एक बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास येत असून चार दिवसांपासून मळ्यात राहणारे नागरिक व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याही बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थ करीत आहेत.(२३ घोटी, १)
बिबट्याची मादी अडकली पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 7:26 PM
घोटी : गेल्या १५ दिवसांपूर्वी खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारात एका बालिकेवर व त्यानंतर आठवड्यात रस्त्याने घरी जाणाऱ्या इसमावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल चार पिंजरे लावण्यात आले होते. मात्र, बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नव्हता. अखेर आज तब्बल १५ दिवसांनी मंगळवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास मादी बिबट्या तीन नंबरच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली.
ठळक मुद्दे१४ दिवसांपूर्वी बालिकेसह एका इसमावर केला होता हल्ला