लासलगाव : कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका मिहलेने पीएचडी करु न डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी मार्गदर्शन केले आहे.उत्तर प्रदेशातील रामनगर तालुक्यातील उमरी भवानीपुर गावच्या (जि. आंबेडकरनगर) कुमूद शुक्ल या महिलेनेअहलाबाद विश्व विद्याल्यात २०१५ ते २०१९ ह्या कालावधीत अँग्रि बिझनेसमध्ये कांदा ह्या विषयावर प्रबंध सादर केला.त्यासाठी शुक्ल त्याच्या पतीसोबत नाशिकला आल्या कांदा क्षेत्राना भेटी दिल्या वेळोवेळी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून माहिती घेतली. त्यांच्या सोबत २५ जण होते. पीएचडीसाठी एकमेव शुक्ल चाच विषय कांदा होता. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याची निवड केली होती.कांदा ह्या विषयावर (बियाणे. लागवड. औषध. मशागत, खर्च. काढणी, साठवूक, बाजारपेठ विक्र ी व्यवस्था व इतर माहिती) पाच वर्ष अभ्यास करु न प्रबंध सादर करु न पीएचडीचे प्रमाणपत्र व डॉक्टर पदवी मिळवली. अॅग्री बिझनेस विषयावर पदवी घेतलेल्या कुमूद शुक्ल यांनी कांद्यावर सखोल अभ्यास करायचा होता. म्हणून कांदा विषय निवडल्यांचे त्यांनी सांगितले. यापुढे ऊत्पादक व ग्राहक यांना किफायतशीर दरात दोघांनाही परवडेल अश्या भावात कसा कांदा देता येईल. ह्या विषयावर त्या अभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे शुक्ल गृहिणी आहे. त्याना दोन मुली आहेप्रतिक्रि यामहाराष्ट्रासह देशभरात नेहमिच चर्चेत राहणार कांदा आणि त्याच कांद्याव पीएचडी मिळवणारी उत्तर प्रदेशातील सदर महीला माझ्यासाठी प्रेरक असुन रात्रंदिवस काबड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवावर देखिल अश्या प्रकारचा प्रबंध सादर होवू शकतो याने मला आनंद झाला आहे.- संजय साठे, नैताळे. ता. निफाड.(फोटो ३० कुमूद शुक्ल)
नाशिकच्या कांदा उत्पादकांवर उत्तर प्रदेशात महिलेला पीएचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:07 PM
लासलगाव : कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका मिहलेने पीएचडी करु न डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी मार्गदर्शन केले आहे.
ठळक मुद्देपीएचडीसाठी एकमेव शुक्ल चाच विषय कांदा होता.