पाळे खुर्द : कळवण उपजिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिनीच महिला रुग्णाची हेळसांड होण्याचा अक्षम्य प्रकार समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी केंद्र सिटी स्कॅन यंत्रणाही बंद स्थितीत होती शिवाय वैद्यकीय अधिकारीही गैरहजर असल्याने रुग्णासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कळमथे येथील वेणूबाई केशव वाघ ह्या वयोवृद्ध रु ग्णास सुरेश पगार हे तपासणी साठी उपजिल्हा रु ग्णालयात घेउन आले असता तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही रक्ताच्या तपासणी करण्यास सांगितले. त्यानुसार पगार हे रु ग्णास लॅब मध्ये घेऊन गेले त्याठिकाणी सदर तपासणी बाजुच्या महालॅब मध्ये होतील असे सांगण्यात आले. रुग्णास महालॅब मध्ये घेऊन गेले असता आज येथे तपासणी होणार नाही असे उत्तर देण्यात आले. यावेळी सुरेश पगार यांनी सुटीवर असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ खैरे यांना संपर्ककरु न गैरसोयीची माहिती दिली परंतु त्यांनीही चौकशी करतो असे वरवर उत्तर देऊन वेळ मारून नेली.गेल्या काही महिन्यांपासून कळवण उपजिल्हा रु ग्णालय हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. सातत्याने डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळवणाºया या रु ग्णालयात थोडे गंभीर रु ग्ण ताबडतोब नाशिक रेफर करणे, खोकला व इतर साध्या आजाराचीही औषधे उपलब्ध नसणे, सोनोग्राफी, सिटी स्कँन यंत्रणा बंद असणे, महिला व बाल वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसणे यासारख्या तक्रारी ऐकायला येत असतात. या सा-या प्रकाराची चौकशी होण्याची मागणी रुग्णांसह नातेवाईकांनी केली आहे.दोन तासांपासून ताटकळतमी सकाळी नऊ वाजेपासून माझ्या बहिणीच्या मुलाला घेऊन दवाखान्यात आले आहे पण दोन तासांपासून ताटकळत रु ग्णालयाच्या आवारात बसावे लागले आहे.-वेणूबाई केशव वाघ,कळमथेचौकशी करून कार्यवाहीसंबंधित रक्तसाठवण गृह ,क्षयरोग विभाग व कृष्ठरोग विभाग येथील अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन रु ग्णाच्या नातेवाईकाना देण्यात आले आहे.- डॉ. घोलप, उपजिल्हा रुग्णालया
महिला दिनी रुग्णालयात महिलेची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 5:11 PM
कळवण उपजिल्हा रुग्णालय : सोनोग्राफी केंद्र बंद, अधिकारी गैरहजर
ठळक मुद्दे सुटीवर असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ खैरे यांना संपर्ककरु न गैरसोयीची माहिती दिली परंतु त्यांनीही चौकशी करतो असे वरवर उत्तर देऊन वेळ मारून नेली.