पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कोथिंबीरची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभाव तेजीत आले. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी ४० रुपये तर कोथिंबीर ३५ रुपये प्रतिजुडी दराने विक्री झाली.सोमवारी बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक वाढल्याने १५ रुपये जुडी दराने विक्री झाली होती. तर मंगळवारी कोथिंबीर जुडीचे बाजारभाव दुप्पट झाल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. १ जूनपासून शेतकºयांनी संप पुकारला असल्याने तीन ते चार दिवसांपासून पालेभाज्यांचे दर कमी अधिक होत आहेत. संपाबाबत शेतकºयांत संभ्रमाचे वातावरण पसरल्याने सुरुवातीला दोन दिवस कमी प्रमाणात शेतमाल दाखल झाला होता त्यावेळी कोथिंबीर ६० रुपये प्रतिजुडी दराने विक्री झालीहोती. शेतकºयांनी आणलेल्या शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्याने रविवारी व सोमवारी कोथिंबीर, शेपू, मेथीचे बाजारभाव १५ ते २५ रुपये प्रतिजुडीवर आले होते. मंगळवारी सायंकाळी बाजार समितीत कमी माल आल्याने साधारण २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली.
मेथी ४०, कोथिंबीर ३५ रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:45 AM
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कोथिंबीरची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभाव तेजीत आले. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी ४० रुपये तर कोथिंबीर ३५ रुपये प्रतिजुडी दराने विक्री झाली.
ठळक मुद्देबाजार समिती : आवक घटल्याने भाव वधारले