नाशिक : सद्या बाजारात मेथीच्या भाजीची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. त्यामुळे जुडीला पाच रु पये तर काही वेळा दहा रु पयात तीन जुडयाही विकल्या जातात. एकलहरे, हिंगणवेढे, जाखोरी शिवारात मोठ्या प्रमाणात मेथीची लागवड केल्याने व्यापारी थेट बांधावरच मेथी खरेदीसाठी येऊ लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी एक दोन एकरचे क्षेत्रात मेथीचे पिक घेतले होते. सुमारे दिड महिन्यात मेथीचे पिक हाती येत असल्याने भाव असला तर शेतकऱ्यांना पैसा मिळतो. मात्र सद्या मेथीला भावच नसल्याने मेथी काढून, जुड्या बांधून मार्केटला नेण्याचा खर्चही शेतकºयांना परवडत नाही. त्यामुळे हिंगणवेढे येथील एका शेतकºयाने चक्क अर्धा एकर क्षेत्रात असलेली मेथी एक एजार रु पयात विकली. मात्र यामुळे लागवडीसाठी लागणारा खर्चही यातून न निघाला नाही.
मेथीची भाजी होतेय कवडीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 3:39 PM
सद्या बाजारात मेथीच्या भाजीची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. त्यामुळे जुडीला पाच रु पये तर काही वेळा दहा रु पयात तीन जुडयाही विकल्या जातात.
ठळक मुद्देजुडीला पाच रु पये तर काही वेळा दहा रु पयात तीन जुडयाही विकल्या जातातएकलहरे, हिंगणवेढे, जाखोरी शिवारात मोठ्या प्रमाणात मेथीची लागवड