नाशिक : महापालिकेत एका कर्मचाºयाकडे केवळ अर्ज घेण्याचे काम तर एका खिडकीवर केवळ अर्ज वितरणाचे काम.. काही ठिकाणी लिपिक आरामात आणि शिपाईच करतात काम.. हे सर्व प्रकार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दौºयात आढळल्याने आता आयुक्तांनी सर्व खाते प्रमुखांना आढावा घेण्यास सांगितले आहे.कोणत्या कर्मचाऱ्यांकडे किती कामे आहेत आणि किती कर्मचाºयांची आवश्यकता आहे याचा डाटाच या निमित्ताने संकलित केला जाणार असून, त्यामुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहे.महापालिकेत सुमारे सहा हजार कर्मचाºयांची नव्याने गरज असल्याचे सांगितले जाते. तथापि, माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ते चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यांनी कर्मचाºयांकडे असलेल्या जबाबदाºया कमी आहेत, तसेच साधी नस्तीसुद्धा अनेक कर्मचाºयांना लिहिता येत नाही असे शेरे अनेकदा मारले होते. त्यानंतर कामकाज कसे करावे यासाठी त्यांनी यशदामार्फत प्रशिक्षण दिले होते. त्यावेळी अनेक कर्मचाºयांना काय व कसे काम करावे याचे प्रथमच प्रशिक्षणदेखील देण्यात आले होते. तथापि, यानंतरही कर्मचाºयांत सुधारणा झालेली नाही. सहा गठ्ठे पध्दतीने कर्मचाºयांकडील कामकाज स्पष्ट होत असले तरी आता त्याचेही अनुकरण केले जात नाही. असे अनेक प्रकार आयुक्त गमे यांनी विविध विभागीय कार्यालयांना दिलेल्या भेटीत आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आता सर्वच कर्मचाºयांकडील कामकाजाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार आढावा घेऊन अधिकाºयांना सुधारित जबाबदाºया देण्याचे नियोजन सुरू आहे. विशेषत: कामचुकार आणि अन्य कर्मचाºयांबाबतची माहिती खाते प्रमुख घेत असून कामचुकारांवर जादा जबाबदाºयाचे नियोजन करण्यात येत आहे.केवळ अर्ज विक्रीचेच कामएखाद्या विभागात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अर्ज स्वीकारणे त्यावरून प्रमाणपत्र तयार करणे तसेच पुन्हा ते संबंधित अर्जदार आल्यानंतर त्याला परत देणे हे काम एकच कर्मचारी करू शकत असताना प्रत्यक्षात मात्र याच कामांसाठी तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एक खिडकी योजनेत तर संबंधित कर्मचारी दिवसभर केवळ अर्ज विक्रीचेच काम करीत असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाºयांची गरज आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेने प्रमाणपत्रांची अर्ज स्विकृती, प्रमाणपत्रांचे वितरण, घरपट्टी भरणे यांसह अन्य कामे करण्यासाठी येस बॅँकेच्या माध्यमातून सामाईक सेवा केंद्र सुरू केले आहेत.४यासंदर्भातदेखील कामांची व्दिरुक्ती होत असते. त्यामुळे त्याचादेखील आयुक्त विचार करीत असून मोजकेच काम करणाºयांना थकीत कराच्या वसुलीसाठी कामाला लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
मनपात कर्मचाऱ्यांच्या कामाचे होणार फेरनियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:09 AM