नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांसाठी पेरणीयोग्य हंगाम असतानाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात आहे.निफाड तालुक्यातील चांदोरी येथील खंडेराव मुरलीधर आहेर (७०) यांनी शुक्रवारी रात्री कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर थोड्याच वेळात विष प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावे गट नंबर ८३१ व ५५९ मध्ये १ हेक्टर ५२ आर इतके क्षेत्र असून, त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. सधन समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात ही सातवी शेतकºयाची आत्महत्या आहे. राज्य शासनाने गेल्या वर्षी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केल्यानंतर आत्महत्यांच्या घटनांना रोख लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु गेल्या वर्षाच्या शेतकºयांच्या आत्महत्येचे लोण यंदाही कायम असून, जानेवारी महिन्यापासून दरमहा कमीत कमी सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात (९) झाल्या असून, त्याखालोखाल सिन्नर, दिंडोरी येथे प्रत्येकी ७ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. पेठ, सुरगाणा व कळवण या आदिवासी तालुक्यांमध्ये मात्र एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही, तर बागलाण (५), नाशिक, देवळा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३, चांदवड, येवला येथे २ व इगतपुरी, नांदगाव येथे प्रत्येकी एक शेतकºयाने आत्महत्या केली आहे.आत्महत्या करणाºया शेतकºयाच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत दिली जात असल्याने ३४ प्रकरणांवर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यातील फक्त १३ शेतकरी कुटुंब आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले असून, २१ प्रकरणांमध्ये शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे, तर १६ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची पन्नाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 12:38 AM
नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, आजवर ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांसाठी पेरणीयोग्य हंगाम असतानाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात ...
ठळक मुद्दे मालेगावी सर्वाधिक : निफाड, सिन्नर, दिंडोरीही अग्रेसर