कळवण : चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून भेंडी व जुनी भेंडी पाझर तलाव भरून मिळावा यासह तालुका दुष्काळी जाहीर करावा व इतर मागण्यांसाठी कळवण तहसील कार्यालयासमोर भेंडी येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला. तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करु न लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी बुधवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले होते. सायंकाळी तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेशी चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच विलास रौंदळ, शिवसेनेचे संजय रौंदळ , गोरख बोरसे, रायुकॉचे प्रविण रौंदळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषणस्थळी सभापती ै संगीता ठाकरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नारायण हिरे, अशोक पवार, उमेश सोनवणे, सुभाष शिरोडे आदीनी भेट घेऊन पाठीबा दिला. अशा होत्या मागण्या : दुष्काळाची तिव्रता लक्षात घेवून मौजे भेंडीची आणेवारी ५० पैसेच्या आत लावण्यात यावी, चणकापूर कालव्याच्या पाण्याने भेंडी व जुनी भेंडी पाझर तलाव भरून मिळावा , चणकापूर उजव्या कालव्याचे आवर्तनाचे पाणी कायमस्वरूपी आरिक्षत करून भेंडी पाझर तलाव भरून मिळत जावा, जनावरांच्या चारा चावण्या लावण्यात याव्यात, विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी, कर्ज माफी करावी, कळवण तालुका जाहीर करावा. (वार्ताहर)दिंडोरी तालुक्यासह इतर भागात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने , पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून , बदादे वस्ती येथे एकच हातपंप असल्याने येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी वेळेवर मिळत नसल्याने ही समस्या दूर करावी याबाबतचे निवेदन प्रशासक नगरपंचायत दिंडोरी यांना माजी ग्रा . प . सदस्य कविता पगारे यांनी दिले . बदादे वस्ती येथील लोकसंख्या २५० ते ३०० इतकी असून , एकच हातपंप असल्याने या हातपंपावर मोठी गर्दी होते, भांडनेही होतात . या भागातील पाण्याची टंचाई दूर करावी अशी मागणी चंद्रकला बर्वे , मंदा वाघ , चांगुणा भामरे , कविता वाघ , सुमन शिंदे , ताराबाई वायकांडे , अलकाबाई गांगुर्डे आदींनी केली आहे .
भेंडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण
By admin | Published: September 09, 2015 12:06 AM