नाशिक शहरातील दैनंदिन कचरा संकलीत करून त्यापासून सेंद्रिय खत आणि अन्य उत्पादने तयार करण्याचे काम पाथर्डी शिवारातील खत प्रकल्पावर नाशिक वेस्ट कंपनीच्या माध्यमातून केले जाते. बीओटी स्वरूपातील या प्रकल्पातून नाशिक महापालिकेला आर्थिक लाभ नसला तरी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी मात्र हा प्रकल्प उपयुक्त ठरला आहे. भूतपूर्व नगरपालिका काळापासून पंचवटीत कचरा डम्प केला जात असे; मात्र तेथे नागरिकांना त्रास होत असल्याने २००० साली पाथर्डी शिवारात कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला. सुरुवातीला लीफ बायोटेक कंपनीने हा प्रकल्प चालवला. त्यानंतर ही कंपनी गेल्यानंतर हा प्रकल्प कसा तरी सुरू होता, तसेच तक्रारीदेखील हेात्या; मात्र नंतर २०१६ मध्ये हा प्रकल्प खासगीकरणातून चालू करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार एका कंपनीला हा प्रकल्प तीस वर्षांसाठी चालवण्यास देण्यात आल्यानंतर त्यांनी नाशिक वेस्ट कंपनी स्थापन करून हा प्रकल्प सुरू केला आहे.
हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा तीनशे टन कचरा तयार होत होता; मात्र सध्या शहरातून ५२५ टन कचरा संकलीत होत आहे. आणखी एक दोन वर्षात कचऱ्याचे संकलन अधिक वाढणे शक्यच असल्याने आता त्या दृष्टिकाेनातून नियोजन सुरू आहे. त्यानुसार क्षमता वाढवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
इन्फो.
या प्रकल्पात सध्या सुरू असलेली कामे
* कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती
* कचऱ्यापासून आरडीएफ (कांडी कोळसा) निर्मिती
* प्लास्टिकपासून फर्नेश ऑईल
* मृत जनावरे जाळण्यासाठी भट्टी
* लँडफील फिलींग
...इन्फो..
नाशिक महापालिकेच्या सेंद्रिय खताला मोठ्या प्रमाणात मागणी असून, त्या माध्यमातून ठेकेदार कंपनीला बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. कांडी काेळशाला मात्र उठाव नाही. अनेक अन्य राज्यातील कारखाने कांडी कोळसा माेफत नेतात. कारण त्यांना वाहतूक खर्च परवडत नाही.