इंदिरानगर : प्रभाग ३० मध्ये भाजपच्या वतीने मराठमोळ्या खाद्यपदार्थ महोत्सवास उदंड प्रतिसाद लाभला.अजय मित्रमंडळ सभागृहाच्या प्रांगणात महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयं संघाचे सुरेश गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. खाद्यमहोत्सवाच्या माध्यमातून घरगुती व्यवसाय करणाऱ्या परिसरातील महिलांना स्वयंरोजगार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. दोन दिवस मराठमोळ्या खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सभागृहनेता दिनकर पाटील, महेश हिरे, नगरसेवक सतीश सोनवणे, उद्धव निमसे, रूपाली निकुळे, संजय कुलकर्णी, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते.या खाद्यमहोत्सवमध्ये चुलीवरचे पिठले, भाकरी, भरीत, ठेचा, चुलीवरची तांदळाची भाकरी, मेथी पराठा, मुंगभजी, गरम गरम कढी फुलके, शेंगोळ्या, थालीपीठ यांसह विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली होती.
इंदिरानगरला महिलांसाठी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:18 AM