नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन आणि कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांनी कामगार दिनापासून म्हणजेच दि.1 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषनाला प्रारंभ केला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून विद्यापीठातील सुमारे 350 कंत्राटी कामगारानी कामबंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्याने विद्यापीठ व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी या कंत्राटी कामगारांनी आमरण साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे.या कामगारांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली होती.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 8:03 PM