लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाऊन आणि कोरोनाचा महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत केवळ ४० कोटी ४२ लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात १४ कोटी ४६ लाख रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे यंदा महापालिकेला महसूल वाढीसाठी झगडावे लागणार असल्याचे दिसते.गेल्या आर्थिक वर्षात महपालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळाले होते. सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या घरपट्टी वसुलीमुळे यंदा महापालिकेला आणखी जास्त उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीसच लॉकडाऊन झाल्याने मार्चअखेरीस मिळणारे चार ते पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकलेले नाही. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षात देयकांची वाट न बघता स्वत:हून पुढे येऊन घरपट्टी भरणाऱ्यांना महापालिका सवलत देते. आॅनलाइन कर भरणा केल्यास आणखी एक टक्का सवलत दिली जाते. एप्रिल, मे आणि जूनमध्ये मिळणाºया सवलतींमुळे नागरिक स्वत: पुढे आल्याने मोठ्या प्रमाणात वसुली होत असते.१ जून मिशन बिगेन सुरू करण्यात आले असले तरी लॉकडाऊन काळात उद्योग धंदे बंद होते, त्यानंतरदेखील आत्ताशी रोजगार सुरू होत आहे. त्याचा परिणाम मनपाच्या वसुलीवर झाला आहे. घरपट्टी संकलनात सर्वच विभागांत मोठी घट आली असली तरी सर्वाधिक फटका पंचवटी विभागाला बसला आहे. या विभागाच्या घरपट्टी वसुलीत ३ कोटी ४१ लाख ७० हजार ९९३ रु पयांची घट झाली आहे. नाशिक पश्चिम विभागात सर्वांत कमी ३२ लाख ५८ हजार ४०८ रु पयांचा फटका बसला आहे.
घरपट्टी वसुलीत पंधरा कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:48 PM
नाशिक : लॉकडाऊन आणि कोरोनाचा महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत केवळ ४० कोटी ४२ लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात १४ कोटी ४६ लाख रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे यंदा महापालिकेला महसूल वाढीसाठी झगडावे लागणार असल्याचे दिसते.
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : सवलत योजना निरुपयोगी