शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

जिल्ह्यात पंधरा जागांसाठी १४८ रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 1:56 AM

नाशिक : विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या सोमवारी अंतिम दिवशी सर्वच मतदारसंघांमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडून अनेकांनी निवडणूक रिंगणातून माघार ...

नाशिक : विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या सोमवारी अंतिम दिवशी सर्वच मतदारसंघांमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडून अनेकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने प्रमुख उमेदवारांमध्येच दुरंगी, तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले तर अनेकांना माघारीसाठी गळ घालूनही उपयोग न झाल्याने बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका दिवसात २१२ उमेदवारांपैकी ६४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यात पंधरा जागांसाठी १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे.माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने राष्टवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची भाजपाचे राहुल ढिकले यांच्याशी लढत होणार आहे.या मतदारसंघातून कवाडे गटाचे उमेदवार गणेश उन्हवणे यांनी माघार घेण्यासाठी राष्टवादी व कॉँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यांनी माघार घेतली नाही. पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे व सुधाकर बडगुजर यांनी माघार घेतली.असली तरी, शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी माघार घेण्यास नकार देत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार सीमा हिरे यांच्यापुढे सेनेच्या बंडखोरीचे आव्हान कायम आहे. याच मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर डॉ. दिलीप भामरे यांनी माघार घेतली आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून मात्र एकही माघार होऊ शकली नाही. त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे. देवळाली मतदारसंघातून माजी नगरसेवक भाजपाचे कन्हैया साळवे, राष्टÑवादीचे नगरसेवक हरिष भडांगे यांनी माघार घेतली आहे. दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व रामदास चारोस्कर यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात राष्टवादीचे आमदार नरहरी झिरवाळ व सेनेचे उमेदवार भास्कर गावित यांच्यात सरळसरळ लढत होणार आहे असून, येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर माणिकराव शिंदे यांनी माघार घेतल्याने राष्टवादीचे छगन भुजबळ यांची लढत सेनेचे संभाजी पवार यांच्याशी होणार आहे. इगतपुरी मतदारसंघातून बाळा मेंगाळ याच्यासह तिघांनी माघार घेतली, मात्र शिवसेनेचे इच्छुक माजी आमदार शिवराम झोले यांच्या पत्नीची उमेदवारी कायम असल्याने इगतपुरी मतदारसंघात सेनेच्या उमेदवार माजी आमदार निर्मला गावित यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. सिन्नर मतदारसंघातून सीमंतिनी कोकाटे यांनी माघार घेतल्यामुळे सिन्नरमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे व राष्टÑवादीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात सरळ लढत होणार आहे. कळवण मतदारसंघातही माकपाचे आमदार जिवा पांडू गावित, राष्ट्रवादीचे नितीन पवार व सेनेचे मोहन गांगुर्डे यांच्यात तिरंगी लढत अटळ झाली आहे.नांदगाव मतदारसंघातून भाजपाच्या जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, पंकज खताळ, सेनेचे माजी आमदार संजय पवार यांनी माघार घेतली असली तरी, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले भाजपाचे रत्नाकर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यासमोर भाजपाच्या बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे. मालेगाव मतदारसंघात ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांची सरळ लढत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्याशी होणार आहे, तशीच लढत चांदवडमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार राहुल आहेर व कॉँगे्रसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यात होणार आहे. मालेगाव मध्य मतदारसंघातदेखील कॉँग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ शेख व एमआयएमचे मौलाना मुफ्ती यांच्यात लढत होईल. या मतदारसंघात भाजपानेही दीपाली वारूळे यांना उमेदवारी दिल्यामुळे तिरंगी लढतीचे चित्र आहे. निफाड मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य व बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यतिन कदम यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम, राष्टÑवादीचे माजी आमदार दिलीप बनकर अशी तिरंगी लढत रंगणार आहे. सटाण्यातही राष्टÑवादी विरुद्ध भाजपा अशी सरळ लढत होईल.जिल्ह्यात दोन ठिकाणी युती आमने-सामनेविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात उमेदवारी दाखल करताना बंडखोरीचे पीक आल्याचे दिसत असले तरी सर्वच पक्षांना प्रमुख उमेदवारांची बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. त्यामुळे आता फक्त नांदगाव येथे शिवसेनेच्या विरोधात भाजप तर नाशिक पश्चिममध्ये भाजपाच्या विरोधात सेनेची प्रामुख्याने बंडखोरी दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्र्यरीत्या लढविल्या होत्या. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार नाही. -सविस्तर वृत्त/्र्र वरशी अटकळ बांधूनच अनेक ठिकाणी तयारी सुरू होती. परंतु लोकसभा निवडणुकीत युती झाल्यानंतर मात्र अनेकांची अडचण झाली त्यानंतर मतदारसंघ बदलण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. परंतु युतीच्या जागावाटपात २००९ मध्ये असलेल्या जागाच कायम राहिल्या. त्यामुळे मात्र इच्छुकांची अडचण झाली असून, त्याचे पडसाद आता उमटत आहेत. नांदगाव मतदारसंघ भाजपासाठी सोडवण्याचा प्रयत्न सुरू होता त्यासाठी खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले होते. परंतु त्यात यश आले नाही तर त्यानंतर नाशिक शहरातील नाशिक पश्चिमच्या बाबतीतदेखील अशीच जागा बदलाची मागणी होती, मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात अस्वस्थता निर्माण झाली. नाशिक पश्चिममध्ये तर शिवसेना इच्छुकांनी एकत्र येऊन स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्हा संपर्क प्रमुखांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फोल ठरला. त्यामुळे तेथे तीन जणांनी अर्ज दाखल केले होते, मात्र तेथे विलास शिंदे यांच्या रूपाने एकच बंडखोर उभे आहे तर नांदगावीदेखील शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे.दिंडोरी, येवला यांसह अनेक मतदारसंघांत शिवसेना तसेच राष्टÑवादीकडूनदेखील बंडखोरी होती, मात्र ती मोडीत काढण्यात पक्ष यशस्वी झाला आहे.दृष्टिक्षेपात जिल्हाच्नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक १९ उमेदवार रिंगणातच्दिंडोरीमध्ये केवळ पाच उमेदवारांमध्ये लढतच्बागलाण, कळवण आणि निफाडमध्ये राहिले प्रत्येकी ६ उमेदवारच्नांदगावला १५, तर मालेगाव मध्यमध्ये १३ उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक