महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह सिडको भागातील रस्ते विकासकामाच्या अंतर्गत वड, उंबर, पिंपळ आदी मोठमोठी झाडे मुळासकट गायब करण्याचा घाट घातला आहे. अर्थात वड, पिंपळ, उंबर आदी झाडे तोडू नयेत, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले असतानाही बेजबाबदार महापालिका अधिकारी सर्व नियमांचे उल्लंघन करीत मोठी झाडे तोडत आहेत. महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी माउली लॉन्स ते प्रणय स्टॅम्पिंग या ठिकाणच्या रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या परिसरातील वड, पिंपळासारखे पंधराहून अधिक मोठे वृक्ष तोडले असून अजूनही या ठिकाणी असलेल्या वडाचे झाड तोडण्याची महापालिकेची तयारी आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून गुरुवारी (दि. १६) वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी माउली लॉन्स येथे जमत महापालिकेच्या वृक्षतोडीविरोधात निषेध नोंदविला. याप्रसंगी पर्यावरणप्रेमी अश्विनी भट, वैभव शोभा, राजाराम देशमुख, अमित कुलकर्णी, सुमित शर्मा, सुमित कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.
(फोटो १६ झाड) --माउली लाॅन्स येथील रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली. त्याबद्दल निषेध नोंदविताना अश्विनी भट, वैभव शोभा, राजाराम देशमुख, अमित कुलकर्णी, सुमित शर्मा, सुमित कुलकर्णी आदी.