नाशिक : सौरमालेतील ‘तांबडा ग्रह’ (रेड प्लानेट) म्हणून ओळखला जाणारा मंगळ हा मागील दोन दिवसांपासून पृथ्वीच्या चांगलाच जवळ आल्याने आकाशात ठळकपणे खगोलप्रेमींना बघता आला. चंद्रग्रहण ‘ब्लड मून’नंतर हा दोन दिवसातील दुसरा खगोलीय अविष्कार नागरिकांनी अनुभवला.पृथ्वीच्या सर्वाधिक जवळचा ग्रह म्हणून चंद्र ओळखला जातो. त्यानंतर ‘शुक्र’चा क्रमांक लागतो. मानवी वस्तीची शक्यता पृथ्वीनंतर चंद्र व मंगळावर होण्याची शक्यता खगोलीय अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे व त्या दिशेने संशोधनदेखील सुरू आहे. मंगळानंतर गुरू ग्रहाचा क्रमांक आहे. सौरमालेतील मंगळ ग्रह पृथ्वीच्या केवळ ५७.६ मिलियन किलोमीटर (५७६ लाख किलोमीटर) इतक्या अंतरावर दिसत होता. ३१ जुलैपासून मंगळ हा पृथ्वीच्या समीप आला असून बुधवारी (दि.१) रात्रीही मंगळ जवळ दिसत असल्याचा अनुभव खगोलप्रेमींनी घेतला. २००३साली मंगळ पृथ्वीपासून ५६० लाख किलोमीटर अंतर इतका जवळ आला होता. आॅक्टोबर २०२०सालीदेखील मंगळ पृथ्वीच्या काही प्रमाणात जवळ येण्याची शक्यता आहे; मात्र यावर्षीप्रमाणे मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ २२२८ येऊ शकतो असे ‘नासा’नी अभ्यासाअंती स्पष्ट केल्याची माहिती स्पेस एज्युकेटर अपुर्वा जाखडी यांनी दिली.दरम्यान, मागील दोन दिवसांपासून खगोलप्रेमींमध्ये या खगोलीय अविष्काराचे कुतुहल पहावयास मिळत असून बुधवारीही बहुतांश खगोलप्रेमींनी घरांच्या छतावर जाऊन दुर्बिण व टेलिस्कोपद्वारे पृथ्वीप्रमाणेच मानवी वस्तीसाठी पोषक ठरु शकणारा मंगळ ग्रह न्याहाळला.--
पंधरा वर्षानंतर अविष्कार : पृथ्वीपासून ५७६ लाख कि.मी वर ‘तांबडा ग्रह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 10:44 PM
मागील दोन दिवसांपासून खगोलप्रेमींमध्ये या खगोलीय अविष्काराचे कुतुहल पहावयास मिळत असून बुधवारीही बहुतांश खगोलप्रेमींनी घरांच्या छतावर जाऊन दुर्बिण व टेलिस्कोपद्वारे पृथ्वीप्रमाणेच मानवी वस्तीसाठी पोषक ठरु शकणारा मंगळ ग्रह न्याहाळला.
ठळक मुद्देआॅक्टोबर २०२०सालीदेखील मंगळ पृथ्वीच्या काही प्रमाणात जवळ येण्याची शक्यता आहे२००३साली मंगळ पृथ्वीपासून ५६० लाख किलोमीटर अंतर इतका जवळ आला होता