लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शुक्रवारी (दि. १२) पाचव्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून, यात ३५ शाळांकरिता ५६ प्रवेश अर्जांची निवड झाली आहे. पाचव्या सोडतीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १६ मेपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पाचव्या फेरीनंतरही काही जागा रिक्त राहिल्यास आणि त्या जागांसाठी अर्जही उपलब्ध असल्यास सहावी फेरीही घेण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. जिल्ह्यातील ४५८ शाळांमध्ये सहा हजारांवर जागांसाठी प्राप्त आॅनलाइन अर्जांच्या आधारे प्राथमिक शिक्षण विभागाने तीन हजार ५२३ विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळाला आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यम शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. येत्या २०१७-१८ शैक्षणिक वर्षात पहिली व पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशप्रक्रि या जून महिन्यापूर्वीच पूर्ण होण्याचे संकेत आहेत. या प्रवेशप्रक्रियेस फेब्रुवारी महिन्यात प्रारंभ झाला असून, पहिल्या फेरीत २ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर रिक्त जागांवर टप्प्या-टप्प्याने आॅनलाइन सोडतीद्वारे प्रवेशप्रक्रि या राबविण्यात आली असून, चार सोडतींच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या चार वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये एकूण तीन हजार ५२३ विद्यार्थ्यांचा विविध शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. या कालावधीत केवळ १७५ विद्यार्थ्यांचा प्रवेश कागदपत्रांअभावी नाकारण्यात आला आहे, तर ९६१ विद्यार्थ्यांनी अन्य शाळेत प्रवेश घेतला आहे. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होऊनही १४७३ पालकांनी याप्रक्रि येकडे पाठ फिरविली. त्यामुळे उर्वरित जागांसाठी शिक्षण विभागाने पाचव्या फेरीसाठी सोडत काढली असून, यातूनही काही जागा शिल्लक राहिला आणि संबंधित जागांसाठी अर्ज उपलब्ध असल्यास सहावी सोडत जाहीर करून आणखी एक फेरी घेतली जाण्याची शक्यता आहे.
शिक्षण हक्कची पाचवी फेरी जाहीर
By admin | Published: May 12, 2017 11:08 PM