लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेत पात्र असूनही नाशिकच्या पाच हजार शेतकºयांना आता हात चोळत बसण्याची वेळ आली आहे. शासनाने दीड लाखांच्या आतील अल्प व मध्यम मुदतीच्या कर्जदार शेतकºयांसाठीच ही योजना आखल्याने नऊ वर्षांचे दीर्घ मुदतीचे कर्जदार शेतकरी आता कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने दीड लाखांच्या आतील शासनाच्या कर्जमाफी योजनेत पात्र असलेल्या एक लाख ४३ हजार कर्जदार शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज अपलोड केले. मात्र त्यातील १०८ कर्जाचे हप्ते (नऊ वर्ष दीर्घ मुदतीचे कर्ज) असलेल्या सुमारे पाच हजार कर्जदार शेतकºयांना विहित १ ते ६६ नमुन्यात हे अर्ज दाखल करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या १ ते ६६ विहित नमुन्यात कर्जाचा हप्ता जास्तीत जास्त ८४ हप्ते इतका दर्शविण्यात आला असून, या पाच हजार कर्जदार शेतकºयांनी जिल्हा बॅँकेकडून घेतलेल्या नऊ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कर्जदार शेतकºयांची माहितीच अपलोड होत नसल्याने या पाच हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणे दिवसेंदिवस अवघड बनत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने या दीर्घ मुदतीच्या या पाच हजार कर्जदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र शासनाच्या कर्जमाफीच्या निकषानुसार जास्तीत जास्त ८४ महिने मध्यम मुदतीचे कर्ज घेणाºयांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने या पाच हजार दीर्घ मुदतीच्या कर्जदार शेतकºयांची बोळवण होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा बॅँकेने माहिती अपलोड केलेल्या एक लाख ४३ हजार आणि इतर बॅँकांकडून कर्जमाफीचे अर्ज आॅनलाइन अपलोेड केलेल्या ३१ हजार अशा एकूण १ लाख ७४ हजार शेतकºयांना दीड लाखांच्या आतील कर्जमाफ होऊ शकते. मात्र त्यातील नऊ वर्षांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेणाºया या पाच हजार शेतकºयांना आता कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत.
‘नऊ’ वर्षांचे ५००० कर्जदार अडकले कर्जमाफीच्या फे-यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 2:57 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेत पात्र असूनही नाशिकच्या पाच हजार शेतकºयांना आता हात चोळत बसण्याची वेळ आली आहे. शासनाने दीड लाखांच्या आतील अल्प व मध्यम मुदतीच्या कर्जदार शेतकºयांसाठीच ही योजना आखल्याने नऊ वर्षांचे दीर्घ मुदतीचे कर्जदार शेतकरी आता कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.जिल्हा मध्यवर्ती ...
ठळक मुद्देनिकष ८४ महिन्यांचा, कर्ज १०८ महिन्यांचे : तांत्रिक अडचण