नाशिक : परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक ग्रामिण, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. या पाचही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ३ हजार ४६५ सराईत गुन्हेगारांची ‘ब्ल्यू प्रिंट’ विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून तयार करण्यात आली असून त्यांच्यावर २ हजार ७९३ पोलीस कर्मचारी ‘वॉच’ ठेवून राहणार असून गुन्हेगार दत्तक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली.दिघावकर म्हणाले, परिक्षेत्रातील गुन्हेगारी कमी करण्यासोबत गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मागील सात वर्षांमध्ये ज्या गुन्हेगारांवर दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, खंडणी, घरफोडी, शस्त्र बाळगणे, महामार्ग लुटीचे गुन्हे दाखल आहेत, अशा सर्व गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश पाचही जिल्ह्यांच्या अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या अधिक्षकांकडून अपर पोलीस अधिक्षकांच्या नियंत्रणाखाली पोलीस ठाणेनिहाय कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक गुन्हेगार दत्तक देण्यात आला आहे. या गुन्हेगाराच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. याबाबतचा अहवाल संबंधितांनी १५ दिवसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही दिघावकर यांनी स्पष्ट केले.जिल्हानिहाय गुन्हेगार अन् कर्मचारी संख्या अशीअहमदनगर - ८९५ गुन्हेगार- ५९६ कर्मचारीजळगाव- १ हजार १४४ गुन्हेगार- ६७५ कर्मचारीनाशिक- ९६७ गुन्हेगार- ८२१ कर्मचारीधुळे- ६४७ गुन्हेगार- ५८९ कर्मचारीनंदुरबार-११२ गुन्हेगार ११२ कर्मचारी असे एकूण परिक्षेत्रातील ३ हजार ७६५ गुन्हेगारांवर एकूण २ हजार ७९३ कर्मचारी लक्ष ठेवुन राहणार आहेत.
पाच जिल्ह्यांतील पावणेचार हजार गुन्हेगार पोलिसांकडून दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 5:07 PM
पाचही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ३ हजार ४६५ सराईत गुन्हेगारांची ‘ब्ल्यू प्रिंट’ विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून तयार करण्यात आली
ठळक मुद्दे२ हजार ७९३ कर्मचारी ठेवणार ‘वॉच’