कळवण : लॉकडाउनमुळे रोजगार बुडालेल्या ाालुक्यातील आदिवासी, मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी सर्वांनी प्राधान्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कळवण, अभोणा व सुरगाणा रु ग्णालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्री तसेच रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांसाठी लागणारी साधने खरेदी करण्याकरिता ५० लाख रु पयांच्या निधीची तरतूद आमदार निधीतून करण्यात आल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेकडून आढावा व निर्माण होत असलेल्या अडचणीसंदर्भात आमदार पवार यांनी कळवण उपजिल्हा रु ग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यास मुख्यालयी थांबून असताना आरोग्य यंत्रणेने निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास जिल्हाधिकारी यांना भाग पाडू असा इशारा पवार यांनी दिला. याचवेळी त्यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची सध्य:स्थितीची परिस्थिती जाणून घेत भ्रमणध्वनीवरु न आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत की नाहीत याचीही माहिती घेतली.नांदुरी येथील आरोग्य केंद्रातील यंत्रणेवर तक्रारीवरून कारवाई करण्याची सूचना यावेळी पवार यांनी केली.जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव होत असून आपल्या तालुक्यात त्याचा शिरकाव होऊ नये याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी केली.नागरिकांची प्रशासनाने माहीती घेऊन खबरदारीच्या दृष्टीने त्यांनी आरोग्य तपासणी करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. गोरगरिबांना अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून धान्याचे वितरण सुरळीत राहावे यासाठी पुरवठा विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी बाजार समतिीचे सभापती धनंजय पवार, जेष्ठ नेते रविंद्र देवरे, भूषण पगार यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी डी एम बहिरम, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुधीर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन माने उपस्थित होते. आरोग्य विभागाने तालुक्यात पुरेशा प्रमाणात मास्क व सॅनिटायझरचा साठा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून दिले. पवार यांनी तत्काळ वरिष्ठ यंत्रणेशी संपर्क साधून आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेला सुविधा उपलब्ध करु न देण्याची सूचना केली. उपस्थित नेत्यांना आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आदींनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या आहेत.
कळवणच्या आरोग्यसेवेसाठी पन्नास लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 10:40 PM
कळवण : लॉकडाउनमुळे रोजगार बुडालेल्या ाालुक्यातील आदिवासी, मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी सर्वांनी प्राधान्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच ...
ठळक मुद्देआढावा बैठक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना