नाशिक- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागु करण्यात आले. त्याच बरोबर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. नाशिक मधील उद्योग क्षेत्र त्यामुळे बंद असल्याने सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, आता येत्या सोमवारपासून (दि.२०) नाशिकमधील ग्रामीण भागातील उद्योग सुरू होणार असल्याने नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योगांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली.प्रश्न- लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यात यश मिळाले नाही.जाधव : नाािशक जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रूग्ण मालेगावमध्ये आढळले. त्यामुळे कोरोनाबाधीत रूग्ण संख्येच्या आधारे रेड आणि आॅरेंज झोन मध्ये नाशिकचा समावेश करू नये त्या ऐवजी मालेगावला हॉट स्पॉट घोषीत करून अवघे चार ते पाच रूग्ण असलेल्या नाशिकला आॅरेंज झोनमध्ये सामाविष्ट करून त्यातील उद्योग सुरू करावे अशी मागणी निमाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शासनाने महापालिका हद्द वगळून उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.प्रश्न: नाशिकमधील औद्योगिक वसाहतीला त्यामुळे किती दिलासा मिळेल?जाधव: २० एप्रिल पासून काही उदयोग व्यवसाय सुरू करता येतील हे पंतप्रधानांनी अगोदरच जाहिर केले होते. त्यामुळे राज्याच्या उद्योग मंत्र्यांकडे निमाने पाठपुरावा करून नाशिक जिल्ह्यातील सर्वच उद्योग सुरू करण्यासाठी मागणी केली होती. मात्र, सद्य स्थितीत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसारच राज्य शासनाने भूमिका घेतली आहे. त्यानुसार मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्र वगळून उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, वाडीवºहे यांच्यासह ग्रामीण भागातील उद्योग सुरू झाल्याने किमान नाशिकमधील ५० टक्के उद्योग सुरू होतील. तेथील कामगारांच्या रोजीरोटीची सोय होईल.प्रश्न: लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राचे खूपच नुकसान झाले आहे..जाधव : होय नाशिकमधील उद्योग क्षेत्राचे किमान दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. आज नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योग सोमवारपासून सुरू होतील. त्यातील सर्वच उद्योजकांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना आणि नियमांचे पालन करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. ते आवश्यकही आहे. मात्र, ३ मे नंतर सर्व उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा आहे.मुलाखत- संजय पाठक
नाशिकमध्ये पन्नास टक्के उद्योग क्षेत्राला दिलासा : शशिकांत जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:12 PM
नाशिक- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागु करण्यात आले. त्याच बरोबर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. नाशिक मधील उद्योग क्षेत्र त्यामुळे बंद असल्याने सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, आता येत्या सोमवारपासून (दि.२०) नाशिकमधील ग्रामीण भागातील उद्योग सुरू होणार असल्याने नाशिकमधील किमान पन्नास टक्के उद्योगांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली.
ठळक मुद्देमनपा क्षेत्रातील उद्योग बंदच राहणारलॉक डाऊनमुळे दोन हजार कोटींचे नुकसान