नाशिक : प्लॉट व फ्लॅट खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम घेऊन संबंधितास खरेदी न देता फसवणूक करून साडेतेरा लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार तिडकेनगरमध्ये घडला आहे़ या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़जिभाऊ गांगुर्डे (६५, तिडकेनगर, नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित ओंकार खैरनार (रा़ शिवाजी चौक, सिडको), संदीप भालके (रा़ तपोवन, टाकळी) व प्रशांत राऊत (पत्ता माहिती नाही) यांनी संगमनत करून २४ जुलै २०१४ ते १० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पाथर्डी फाटा परिसरात प्लॉट तसेच फ्लॅट देतो, असे खोटे सांगून १७ लाख ५० हजार रुपये रोख तसेच धनादेश स्वरूपात घेतले़ मात्र वेळोवेळी मागणी करून प्लॉट व फ्लॅटची खरेदी न देता वेळोवेळी वेगवेगळ्या रकमेचे खोटे धनादेश देऊन गांगुर्डे यांची १३ लाख ५० हजार रुपयांची पुसवणूक केली़गांगुर्डे यांनी दिलेल्या रकमेची मागणी केली असता संशयितांनी दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
साडेतेरा लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:37 AM
प्लॉट व फ्लॅट खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम घेऊन संबंधितास खरेदी न देता फसवणूक करून साडेतेरा लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार तिडकेनगरमध्ये घडला आहे़ या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ठळक मुद्देगुन्हा दाखल : फ्लॅट खरेदीच्या नावाखाली गैरप्रकार