शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तासाठी तैनात राहणाऱ्या चारशे होमगार्डचे ५२दिवसांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 1:57 PM

पोलिसांप्रमाणेच होमगार्डवरसुध्दा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असताना त्यांना मानधनाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देप्रत्येकी ३४ हजार ८४० रुपये :चारशे होमगार्डचे मानधन एक कोटीच्या घरात

संजय शहाणे, नाशिक : कोरोनाशी दोन हात करताना पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तासाठी दिवस-रात्र शहरातील रस्त्यांवर तैनात राहणाऱ्या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना मागील दोन महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा कायम आहे. शहरात सुमारे चारशे होमगार्डवर मानधन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाच्या काळात चोख बंदोबस्तावर हजर राहून नाकाबंदी, फिक्स पॉइंटवर कर्तव्य बजावूनदेखील मागील दोन महिन्यांपासून होमगार्डच्या पदरात मानधनाची रक्कम पडलेली नाही. मात्र ही व्यथा सांगू कुणाकडे? अशीच काहीशी अवस्था सध्या होमगार्डची झाली आहे.शहरातील भद्रकाली, अंबड, सातपुर, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, इंदिरानगर, सरकारवाडा, गंगापुर, नाशिकरोड, मुंबईनाका, उपनगर, देवळाली कॅम्प अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्तासाठी मागील चार महिन्यांपासून होमगार्ड पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उभे आहेत. आगामी गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पोलिसांप्रमाणेच होमगार्डवरसुध्दा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असताना त्यांना मानधनाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नाशिक शहरातील सर्वच पोलिस ठाण्यात पोलिसांच्या बंदोबस्तासाठी सुमारे चारशे होमगार्ड मदतीला घेण्यात आले आहे परंतु जानेवारीचे ३१दिवस, एप्रिलचे दहा दिवस, आणि मे महिन्याचे अकरादिवस असे एकूण ५२ दिवस कोरोना महामारी काळात जीवाची परवा न करता पोलिसांच्या बरोबरीने नाकाबंदी, गस्तीवर कर्तव्य बाजावूनसुध्दा अद्याप मानधनाची रक्कम चारशे होमगार्डच्या पदरात पडलेली नाही हे विशेष!

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस