पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुखारी बाग येथे न्यू इरा शाळेतील शिक्षक सोमवारी आपले दैनंदिन ऑनलाइनचे काम आटोपून गेले होते. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास संस्थेच्या अध्यक्षांनी शाळेस भेट दिली असता, सदर प्रकार घडल्याचे समजले. यात संगणक कक्षातील लेन्स, तीन सीपीयू,२२इंची तीन एलसीडी व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण एक लाख ७४ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून शाळा बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शाळांमध्ये मोजकेच शिक्षक असतात, तर अनेक शाळांमध्ये रखवालदार नाही. याचाच फायदा घेत चोरट्यांकडून आता शाळांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक व्ही. एल. भोये, मनपाच्या विरोधी पक्षनेत्या शान ए हिंद, नगरसेवक मोहम्मद मुस्तकिम डिग्निटी यांनी शाळेस भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाझिम शेख करीत आहे.