मालेगाव : मराठा आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असे प्रतिपादन भाजपा नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर केले. यावेळी बंडूकाका बच्छाव यांनी बैलगाडीमध्ये त्यांची सवाद्य मिरवणूक काढून त्यांचे स्वागत व सत्कार केला. बच्छाव यांनी प्रास्ताविक करून मराठा समाजातील भूमिहीन, घरहीन तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळत नसलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील मराठा बांधवांना इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे, हीच मालेगाववासीयांची इच्छा असल्याचे सांगितले. तालुक्याच्या वतीने विखे - पाटील यांना चांदीचा गणपती भेट म्हणून देण्यात आला. धडपड करून समाजाकरिता अविरतपणे प्रत्येक प्रसंगाला धावून जाण्याची बंडूकाकांची भूमिका अभिमानास्पद असल्याचे विखे - पाटील यांनी नमूद केले. येथील बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू बच्छाव यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत पाटील बोलत होते.
यावेळी विखे - पाटील पुढे म्हणाले, राज्याने अद्याप मराठा आरक्षणावर न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायची इच्छाच नाही. फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकवलं होतं, दुर्दैवाने या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यातील सर्व मराठा संघटनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे ध्येय असल्याचे मतदेखील राधाकृष्ण विखे - पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, सुनील गायकवाड, कमलाकर पवार, रिपाइं नेते भरत चव्हाण, दिलीप अहिरे, भारत म्हसदे, भारत जगताप, धनगर समाजाचे आर. पी. कुवर, अरुण शिरोळे, समाधान ठोंबरे, कैलास पवार, प्रकाश पवार, साबिर हाजी, निजाम हाजी, जितेंद्र देसले, भरत पाटील, दादाजी जाधव, काकाजी शिरोळे, नंदू बच्छाव, सरपंच सुरेश शेलार व संदीप अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------
मालेगावी राधाकृष्ण विखे - पाटील यांचे स्वागत करताना बंडू बच्छाव समवेत आमदार राहुल आहेर, भारत चव्हाण आदी. (०९ मालेगाव १)
===Photopath===
090621\09nsk_1_09062021_13.jpg
===Caption===
०९ मालेगाव १