बाजारात चैतन्ययेवला : जिल्ह्यातील सुमारे ६० हजार लोकवस्तीच्या येवला या गावात कापडाचा उद्योग सध्या चांगलाच बहरतोय. पारंपरिक चौकटीला नवा लुक देत आणि आधुनिकता स्वीकारत व्यवसायात अनेकांनी यशस्वी भरारी घेतली आहे. उद्योग व्यवसाय करण्याची मनापासून इच्छा व आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्याची जिद्द यामुळे येवल्याच्या कापड उद्योगाला एक नवी दिशा मिळत आहे. पैठणीसह अन्य प्रकारच्या साडी व एकूणच कापड उद्योगाला नव्या शिखरावर नेऊन त्या उद्योगात यशाचे शिखर गाठणारी अनेक मंडळी या व्यवसायात आता आपले पाय घट्ट रोऊन उभी आहे. महाराष्ट्रात राहणारा म्हणजे मराठी माणूस आण िव्यवसाय हा मराठी माणसाचा पिंड नाही हा समज खोटा ठरवत केवळ दृढनिश्चयाचा बळावर हे यश मिळवणारे पैठणी सह कापड उद्योगाची व्याप्ती येवल्यातून देशिवदेश पातळीवर गेल्याचे चित्र पहावयास मिळते.युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाचा मार्ग निवडावा जेणे करु न किमान स्वत:चा चांगला रोजगार उपलब्ध होईल. शून्यातूनही माणूस जग निर्माण करू शकतो. अनेक कुटुंबांनाही सन्मानाने जगता यावे, यासाठी छोटासा प्रयत्न करीत आहे. - बाळासाहेब कापसे, पैठणी उद्योजक, येवलानोटाबंदीच्या परिणामानंतर सावरलेल्या सराफी व्यवसायाला जीएसटीमुळे काहीशी झळ बसली. खेड्या- पाड्यावरील अनेक लोकांचे बँकेत खाते नसल्याने त्यांच्याकडे चेकबुक असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे व्यवहार करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. - राजेंद्र माडीवाले, सराफ व्यावसायिक
कापड व्यवसायाने घेतली भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:58 PM