शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

दोन पारंपरिक घराण्यांमध्येच रंगणार लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:30 AM

प्रत्येक निवडणुकीत सुरुवातीला तिरंगी-चौरंगी वाटणारी निवडणूक शेवटी दुरंगीच होत असल्याने यंदाही निफाडमध्ये दोन पारंपरिक घराण्यांमधील वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देनिफाड: निवडणूक राग-रंगप्रभावी नेत्यांचा अभाव : महायुतीला रोखण्याचे आघाडीसमोर आव्हान

सुदर्शन सारडाप्रत्येक निवडणुकीत सुरुवातीला तिरंगी-चौरंगी वाटणारी निवडणूक शेवटी दुरंगीच होत असल्याने यंदाही निफाडमध्ये दोन पारंपरिक घराण्यांमधील वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे.२०१४ मध्ये युती तुटल्यामुळे मोदी लाटेतदेखील शिवसेनेचा अबाधित राहिलेला बालेकिल्ला यंदा युती म्हणून लढवला जात असून, त्याला राष्ट्रवादी काँगे्रस आघाडी व बहुजन विकास आघाडीचे आव्हान देण्याचे विरोधकांचे मनसुबे कितपत यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.महाराष्टÑाचा कॅलिफोर्निया म्हणून निफाडची जशी ओळख आहे, तशीच येथील राजकारणाचीदेखील वेगळी ओळख आहे. विरोधकांच्या घरी पुरणपोळी खाण्याचे भाग्य केवळ निफाड तालुक्यातच मिळते. होऊ घातलेल्या निफाड विधानसभेच्या निवडणुकीत एकूण सहा उमेदवार रिंगणात असून, त्यात पाच अधिकृत पक्षांचे, तर एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. खरी लढत पारंपरिक घराण्यात होईल हे निर्भेळ सत्य असले तरी, कदम विरुद्ध बनकर हा अंतिम सामना रंगेल असे चित्र आहे.आमदार अनिल कदम हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत, तर माजी आमदार दिलीप बनकर हे पाचव्यांदा नशीब आजमावत आहेत. अनिल कदम यांनी मागील दोन्ही निवडणुकांत विजय मिळवत राजकारणातील आपला दबदबा कायम ठेवला आहे, तर बनकरांना केवळ एकदा आमदारकी लाभलेली आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अपक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम हेदेखील नशीब आजमावत आहेत. आमदार अनिल कदम यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे सर्वाधिक उलाढाल असलेल्या बाजार समितीचे सभापती म्हणून दिलीप बनकर यांची ओळख गेल्या दोन दशकांपासून आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य तर मागील वर्षी त्यांच्या पुतण्याने पिंपळगाव ग्रामपंचायतमध्ये काबीज केलेली सत्ता ही त्यांची जमेची बाजू आहे. निर्णायक असलेल्या गोदाकाठ भागात आघाडीकडे प्रभावी नेता शिल्लक नसल्याचे चित्र आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देअनेक अडचणींचा सामना करणाºया निसाका, रासाकाची चाके कधी फिरणार?४द्राक्ष उत्पादन पाहता तालुक्यात द्राक्ष संशोधन केंद्र होणे गरजेचे.४होऊ घातलेला ड्रायपोर्ट प्रकल्प अनेक अडचणींच्या जाळ्यात अडकला आहे, तो पूर्ण कधी होणार?हॅट्ट्रिक पराभवाची की विजयाची ?निफाड मतदारसंघातील लढत तिरंगी वाटत असली तरी, ती शेवटच्या टप्प्यात दुहेरी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रश्न आहे तो हॅट्ट्रिक रोखण्याचा. या निवडणुकीत आमदार अनिल कदम विजयाची हॅट्ट्रिक करून दिलीप बनकरांची पराभवाची हॅट्ट्रिक पूर्ण करणार, की बनकर कदम यांची विजयाची हॅट्ट्रिक रोखून पराभवाची हॅट्ट्रिक खंडित करतात, याकडे तालुक्यातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन निवडणुकांपासून निफाड मतदारसंघात बनकर विरुद्ध कदम असा सामना रंगत आहे. यावेळीही त्यांच्यातच चुरस आहे.बदललेली समीकरणेनिफाड तालुक्यातही गेल्या महिनाभरात पक्षांतराचे वातावरण होते. त्यामुळे आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. यंदा विरोधकांकडून प्रस्थापितांविरुद्ध नकारात्मक भावनेचा प्रचार केला जात आहे.सात जिल्हा परिषद गटांत शिवसेना-राष्ट्रवादी तीन ठिकाणी समान आहे, तर एक अपक्ष आहे. पंचायत समितीत सेनेची सत्ता आहे. निफाड नगरपंचायतमध्येदेखील तीन नगरसेवकांनी केलेल्या पक्षांतरामुळे तेथे राष्ट्रवादी शून्यावर आली आहे.संपूर्ण भारतात निर्यातक्षम द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध असलेला निफाड तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. पूर्वी मोगल आणि कर्मवीर गटात सत्ता संघर्ष होता, तो आता कदम आणि बनकर गटात दिसून येत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019niphad-acनिफाडAnil Kadamअनिल कदमShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस