पहिली फिर्याद भामाबाई सुकदेव शेवलेकर यांनी दिली असून, त्यात चंद्रकला विलास कवडे, विलास कवडे, नाना शेवलेकर, अंबादास शिंदे यांनी भामाबाईच्या मुलीस दत्त मंदिराचे दरवर्षीचे पूजाअर्चा करताना भाविकांकडून साठ हजार रुपये जमा होतात, ते पैस दे नाही तर पूजाअर्चा बंद कर, असा दम दिला. यावर भामाबाई व त्यांच्याच बाचाबाची होऊन चौघांनी भामाबाई यांना हवा भरण्याचे पंपाने मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हरिचंद्र पालवी हे करीत आहेत. तर दुसऱ्या फिर्यादीत विशाल दत्तू तळेकर याने शिनाबाईचे मंदिरात एका महिलेस अंगलट येउन मारहाण केली. याबाबत या महिलेने चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. एस. देवरे हे तपास करीत आहेत. दरम्यान, चांदवड पोलीस स्टेशनला परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दत्ताचे शिंगवेत पूजाअर्चा करण्यावरून मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:10 AM