गोकूळ सोनवणे सातपूरमहानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासमोर त्यांचाच पुतण्या प्रेम पाटील यांचे आव्हान आहे. पाटीलविरु द्ध पाटील या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून असेल. तर याच प्रभागातून विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढेदेखील निवडणूक लढवीत असून, त्यांच्या विरोधात तब्बल १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत नवीन प्रभाग रचनेनुसार सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक ९ मध्ये शिवाजीनगर, ध्रुवनगर, श्रमिकनगर, धर्माजी कॉलनी, मोतीवाला कॉलेज आदि भागाचा समावेश आहे. गेल्या २५ वर्षांपासून या भागात पाटील कुटुंबीयांनीच (दशरथ पाटील, दिनकर पाटील, लता दिनकर पाटील) यांनी नेतृत्व केलेले आहे. राजकीय पक्षांपेक्षा पाटील ज्या पक्षात त्याच पक्षाचे वर्चस्व असे समीकरण आहे, परंतु या निवडणुकीत भाजपाकडून दिनकर पाटील उमेदवारी करीत आहेत, तर त्यांच्याच विरोधात त्यांचे पुतणे प्रेम दशरथ पाटील उभे ठाकले आहेत. शिवाय शिवसेनेतर्फे साहेबराव जाधव उमेदवारी करीत आहेत. या सर्वसाधारण गटातून एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत.अनुसूचित जाती गटात रिपाइंचे उमेदवार नगरसेवक प्रकाश लोंढे निवडणूक लढवीत आहेत, तर भाजपाचे रवींद्र धिवरे, मनसेचे अंबादास अहिरे, काँग्रेसचे गोपाळ बस्ते, शिवसेनेचे सागर जारे, बसपाचे प्रशांत तिवडे यांच्यासह एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. लोंढे यांना त्यांच्या मूळ प्रभागात आरक्षणाचा फटका बसल्याने त्यांना या प्रभागातून एकटेच निवडणूक लढवावी लागत आहे. ओबीसी महिला गटात भाजपाच्या हेमलता कांडेकर, शिवसेनेच्या ज्योती काळे व अपक्ष सुवर्णा मंडळ यांच्यात लढत होत आहे. तर सर्वसाधारण महिला गटातून भाजपाच्या वर्षा भालेराव यांच्यासमोर शिवसेनेच्या सविता गायकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. या दोघांतच लढत होणार आहे. एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात नगरसेवक दिनकर पाटील यांनी त्यांच्या पसंतीचे उमेदवार घेऊन पॅनल तयार करून ते स्वत: पॅनलचे नेतृत्व करीत आहेत.पाटीलविरूद्ध पाटील संघर्ष रंगणार : सर्वांचेच लक्ष लागले
लढत नात्याची आणि काट्याची
By admin | Published: February 11, 2017 12:15 AM