नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला असून, त्यांनी हिंदुस्थान जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पहिल्या दिवशी १४ उमेदवारांनी ३६ अर्ज नेले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक तसेच व्हिजिलेन्स पथक नेमण्यात आले असून, विभागात मतदानासाठी ९४ केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत.शिक्षक मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत ७ जून रोजी आहे. तत्पूर्वी प्रमुख उमेदवारांचे अर्ज मुहूर्तावर दाखल होणार असून, पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल होणे व १४ उमेदवारांनी ३६ अर्ज नेणे ही संख्या लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षक लोकशाही आघाडीने संदीप बेडसे यांना, तर भाजपाच्या शिक्षक भारतीने अनिकेत पाटील याची उमेदवारी यापूर्वीच घोषित केली आहे. शिवसेनेकडूनही निवडणूक लढविली जाणार असल्याने आज, उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस पाहता, मोठ्या प्रमाणात मतदारांना आमिषे दाखविण्याचे प्रकार घडणे शक्य असल्याने व त्यात आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता असल्याने विभागीय आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्णात भरारी पथके गठीत केली आहेत.या निवडणुकीसाठी विभागात ९४ मतदान केंद्रे असून, त्यापैकी नाशिक जिल्ह्णात २५ मतदान केंद्रे असतील. विभागात सर्वाधिक मतदारांची संख्या नाशिक जिल्ह्णात १४८३० आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी एक अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 2:00 AM
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.
ठळक मुद्दे१४ उमेदवारांनी ३६ अर्ज नेले विभागात मतदानासाठी ९४ केंद्रे जाहीर