नाशिक : शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथे हिंदू सुवर्णकार समाजाविषयी केेलेल्या वक्तव्यामुळे समाजाची बदनामी झाली असून, त्यामुळे व्यतित होऊन समाजाचे प्रतिनिधी ह.भ.प. सुनील मधुकर माळवे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप करीत सुवर्णकार समाजाने बच्चू कडू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आडगावकर कुटुंबातील विवाह प्रकरणात निर्माण झालेल्या वादाची वास्तविकता जाणून न घेता एकतर्फी माहितीवर आधारित संपूर्ण हिंदू सुवर्णकार समाजाविषयी निषेधार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करीत सर्व शाखीय सुवर्ण समाजातर्फे मंगळवारी (दि.२० ) सराफ बाजारात आंदोलन करण्यात आले. यावेळी लाड सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष सुनील महालकर, अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, लाड सुवर्णकार समाज संस्था त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राजीव शहाणे, ओम लोड सुवर्णकार समाज संस्था सिडकोचे अध्यक्ष विजय महाले, सुरेखा लोळगे, सारिका नागरे आदींनी बच्चू कडू यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलनात सहभाग घेतला.
200721\20nsk_53_20072021_13.jpg~200721\20nsk_54_20072021_13.jpg
शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन करताना सर्व सुवर्णकार समाजाचे कार्यकर्ते ~शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन करताना सर्व सुवर्णकार समाजाचे कार्यकर्ते