ठळक मुद्देअफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
नाशिक : शहरातील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये बुधवारी (दि.१०) एका समाजाच्या भावना दुखविणारी ह्यपोस्टह्ण एका संशयित समाजकंटकाने व्हायरल केली. याप्रकरणी संध्याकाळी काही नागरिकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत, त्या समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तात्काळ संशयिताचा माग काढत त्यास बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी संशयिताच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १५३(अ), २९५(अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला कारवाईची संपूर्ण माहिती देत, कायदा कुणीही हातात घेऊ नये आणि कुठल्याही प्रकारे अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. यानंतर जमलेले नागरिक निघून गेले.