नाशिक : द्वारका येथील कांचन मोटर्स या वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या शोरूमविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात १ कोटी ४५ लाख ९८ हजार ९३२ रुपये अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारकाचौक येथील कांचन मोटर्स या शोरूमद्वारे नव्या-जुन्या वाहनांची विक्री तसेच खरेदी केली जाते़ या व्यवसायाचा गेली दोन वर्षांपासूनचा व्हॅट कर या शोरूमच्या वतीने भरण्यात आलेला नाही़ यामुळे विक्रीकर विभागाच्या वतीने याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात अपहार व मूल्यवर्धित कर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
अपहाराचा गुन्हा दाखल
By admin | Published: January 05, 2015 1:42 AM