शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांवर गुन्हे दाखल

By admin | Published: August 21, 2016 11:27 PM

कोट्यवधींची फसवणूक : गुंतवणूकदारांना दाखविले आमिष

नाशिक : गुंतवूणकदारांना वार्षिक २४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हॉउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचे प्रमुख संचालक विनोद पाटील यासह दहा संचालकांवर शनिवारी (दि़२०) गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूक, एमआयडीसी कायदा ३/४ सिक्युरीटीज कॉन्ट्रॅक्टर कायदा कलम १९५६ चे कलम २३ व कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६७, ३७४, ७५, ४४७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी दिले होते़गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश गुरुनाथ देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंपनीचे संचालक संशयित विनोद बाळू पाटील (रा.नवीन नाशिक), सुशांत रमेश कोेठुळे (रा. तपोवन), भगवंत कोठुळे (रा. तपोवन), महेश सुधाकर नेरकर (रा. नवीन नाशिक), अनिल निवृत्ती कोठुळे (नवीन नाशिक), रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड), सतीश सेषराव कामे (रा. नवीन नाशिक), विजय लक्ष्मण खूनकर व सुरेखा भगवंत कोठुळे (रा. जेजूरकर मळा, तपोवन) यांनी गुंतवणुकीवर २४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे़ हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटमध्ये ११ लाख रुपये गुंतवल्यानंतर सात महिने होऊनही संचालकांनी परतावा न देता फसवणूक केल्याची तक्रार गिरणारे येथील शेतकरी गणेश रवींद्र काटे याने मे पोलीस आयुक्तांकडे केली होती़ त्यावर कारवाई झालेली नव्हती तसेच कंपनीच्या संचालकांकडून पैसे परत देण्याचे आश्वासन दिले जात होते़ दरम्यान, पोलीस प्रशासनाने संचालकांना वेळ देऊनही त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्याचे धोरण सुरूच ठेवल्याने आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिलेल्या आदेशनुसार हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला़संचालक विनोद पाटील याने गुंतवणूकदारांची रक्कम पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड सर्व्हिसेस, विनोद बुलियन्स दुबई, हाउस आॅफ बुलियन्स, हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट, हाउस आॅफ बिल्डकॉन, हाउस आॅफ अ‍ॅग्रो कम्युनिटी यांसह इतर कंपन्यांच्या माध्यमातून शेअर मार्केट तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवले. पाच ते सहा महिन्यांपूर्वी पाटील यांनी व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदारांनी मुद्दल परत मागण्यास सुरुवात केली होती. (प्रतिनिधी)