उपनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा, तोरणं आदि शोभिवंत वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती सजावटीसाठी झेंडू, शेवंती, मोगरा, सूर्यफुल, गुलाब, कमळ, निशिगंध, जास्वंदीसह अनेक फुलांसारख्या प्लॅस्टिक फुलांच्या माळा, तोरणे, फुलांचा गुच्छ, फुलांची महिरप व कमान आदि शोभिवंत वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत.प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा २५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत, बुके ३०० ते ४००, फुलांची महिरप, कमान- ८०० ते १००० रुपये, प्लॅस्टिक शोभेची झाडे- ३०० रुपये, तोरणमाळा- २०० ते ५०० असे विविध शोभिवंत प्रकार दाखल झाले आहेत. प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा या पाण्याने धुऊन पुन्हा वापरता येत असल्यामुळे अशा वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगरसमोर विक्रेत्यांनी विक्रीस आणलेल्या प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा बघण्यासाठी व खरेदी करण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी होत आहे. (वार्ताहर)
गणेशोत्सवासाठी सजावट साहित्य दाखल
By admin | Published: August 27, 2016 10:30 PM