्रपंचवटी : येथील पंचवटी परिसरात यंदाही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणाºया सार्वजनिक मित्रमंडळांनी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे, तर काही मंडळांचा यंदा पर्यावरणाला पोषक अशा इको फ्रेंडली गणेशोत्सवाकडे कल असल्याचे दिसून येते. काहींनी गणेशोत्सवाच्या कालावधीत सलग दहा दिवस विविध सांस्कृतिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंचवटीतील दिंडोरीरोड, पेठरोड, मेरी, म्हसरूळ, आडगाव, नांदूर, मानूर आदिंसह परिसरातील मंडळांनी यंदा गणेश देखावे साकारले आहे.शिवाजी चौकातील भगवती सांस्कृतिक कला, क्रीडा मित्रमंडळाने यंदा ११ फुटी दगडू हलवाई गणेशाची मूर्ती साकारली आहे. मंडळाचे यंदा हे ४१वे वर्ष आहे असे संस्थापक अध्यक्ष अनिल वाघ यांनी सांगितले. पेठरोडवरील श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाचे गणेशोत्सव सादर करण्याचे ४९ वे वर्ष असून, यंदा मंडळातर्फे पर्यावरणपर देखावा साकारला आहे. वाढते ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यामुळे मानवी जीवनावर कसे दुष्परिणाम होतात याचे भित्तीचित्र साकारून पर्यावरण बचावचा संदेश देण्यात आला असल्याचा देखावा साकारल्याचे मंडळाचे लक्ष्मण धोत्रे यांनी सांगितले.
धार्मिक देखाव्यांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 12:00 AM