संजय पाठक, नाशिक- नवीन वाहन कायद्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे पेट्रोलडिझेल टँकर चालकांनी आंदोलन सुरू केले असून एकही टँकर भरू दिले जात नसल्यामुळे सध्या येथे पाचशे ते सहाशे टँकर उभे आहेत आज दुपारपर्यंत टँकर न भरल्यास नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि काही भागात पेट्रोलडिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने सुधारित वाहन कायदा तयार केला असून त्यातील काही अटी जाचक असल्याची वाहन चालकांची तक्रार आहे विशेषतः अपघात प्रकरणी दहा वर्षे शिक्षा ही जाचक असल्याचे चालकांचे म्हणणे आहे त्याच्यावर विविध ठिकाणी वाहन चालक संघटना आज पासून आंदोलन करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील पानेवाडी येथे डिझेल पेट्रोल भरण्यासाठी गेलेले टँकर थांबवून ठेवण्यात आले आहेत यात नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांच्या टँकरचा ही समावेश आहे दुपारपर्यंत भरणा सुरू न झाल्यास नाशिक जिल्ह्याचे अनेक भागात पेट्रोल पंप ड्राय होतील असे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले.