नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ यंदाच्या वर्षी डोगरी भाषेतील प्रख्यात साहित्यिक तथा चित्रपट लेखक व दिग्दर्शक वेद राही यांना घोषित करण्यात आला आहे. रोख एक लाख रु पये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच समारंभपूर्वक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी दिली आहे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सन २०१० पासून ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ दिला जातो. आजवर जयंत कैकीनी, चंद्रकांत देवताले, डॉ. विष्णू खरे यासह विविध साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदाच्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी वेद राही यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली. १९८३ मध्ये डोगरी भाषेतील कादंबरी ‘आले’ बद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने १९९० मध्ये मानाचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले तर २०११ मध्ये केंद्रीय हिंदी संस्थानने त्यांना मानाचा ‘महापंडित राहुल संक्र ीतायायान’ पुरस्कार प्रदान केला. याशिवाय २०१२ मध्ये जम्मू-काश्मीर शासनाने ‘जीवनगौरव’ पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत वेद राही यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बेजुबान, चरस, संन्यासी, बे-ईमान, मोम की गुड़िया, आप आये बहार आई, पराया धन, पवित्र पापी आदि चित्रपटांचा समावेश होतो. याशिवाय त्यांनी नऊ चित्रपट व काही दूरदर्शन मालिकांचे दिग्दर्शन केले असून ‘काली घटा’ नामक चित्रपटाची निर्मितीही केली आहे.सावरकर चरित्रपटामुळे विशेष ओळखस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर’ (१९८२) या चरित्रपटामुळे व दूरदर्शनवरील लोकप्रिय अशा ‘गुल गुलशन गुलफाम’ या मालिकेमुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. वेद राही यांनी हिंदी व डोगरी भाषेतून लिखाण केले. डोगरी भाषेत त्यांच्या नावावर सात प्रसिद्ध कादंबऱ्या, तीन कथासंग्रह व एक डोगरी भाषेतील काव्यकथा एवढी ग्रंथसंपदा आहे.
चित्रपट लेखक व दिग्दर्शक वेद राही यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 5:54 PM
मुक्त विद्यापीठाची घोषणा : लवकरच पुरस्कार वितरण सोहळा
ठळक मुद्देडोगरी भाषेत त्यांच्या नावावर सात प्रसिद्ध कादंबऱ्या, तीन कथासंग्रह व एक डोगरी भाषेतील काव्यकथा एवढी ग्रंथसंपदा आहे.