ओझर : नाशिकहून पिंपळगावकडे जाताना तीन नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.ओझर येथील गडाख कॉर्नर, सायखेडा चौफुली, के. के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल, चिंचखेड चौफुली असे तीनही उड्डाणपुलांना अंतिम मंजुरी मिळाली असून, येत्या महिन्यात बांधकामास सुरुवात होणार आहे. यासाठी चिंचखेड चौफुलीसाठी २३ कोटी ९७ लाख, गडाख चौफुलीसाठी २२.९२ लाख, तर सायखेडा चौफुलीजवळील उड्डाणपुलासाठी २०.५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येथील महामार्गालगत असलेल्या अपूर्ण सर्व्हिस रोडच्या कामास गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. पुढील दोन महिन्यात उड्डाणपुलाच्या कामास सुुरुवात होणार असल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ओझर परिसरातील सर्व्हिस रोड तसेच उड्डाणपुलाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे ओझरकरांसाठी येणारे नववर्ष सुखद असेल अशीच भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ओझर येथील गडाख कॉर्नर येथे, सायखेडा चौफुली, के. के. वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल व चिंचखेड चौफुली येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या कामाचे टेंडर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंत्रालयाकडे मंजुरीसाठी गेले असून, तेही मंजूर झाल्याने अपूर्ण उड्डाणपुलांच्या कामांची सुरुवात येत्या काळात होणार आहे. ईपीसी १ अंतर्गत अपूर्ण असलेल्या एकूण १६ कामांना सुरुवात झाली आहे. दुसºया टप्प्यातील कामे कंत्राटदार बी. पी. सांगळे यांनी घेतली आहेत. यात दहावा मैल येथे हायमास्ट लॅम्प, मराठा विद्या प्रसारक महाविद्यालयाच्या समोर भुयारी मार्ग असणार आहे. तसेच रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील सध्या अपूर्णावस्थेतील दोन्ही बाजूंकडील सर्व्हिसरोडचे काम आदींचा समावे श असून, या कामांना सुरुवात झाली आहे. याव्यतिरिक्त ६६ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे ओझर येथील सायखेडा चौफुली ते नवीन इंग्रजी शाळा या ठिकाणी अपूर्णावस्थेत असलेली कामेही पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे सायखेडाकडून येणाºया वाहतुकीला लगाम बसणार आहे. येत्या काळात होणाºया उड्डाणपुलामध्ये खंडेराव मंदिरासमोर पुलाखालून ये-जा करण्यासाठी मार्ग होणार आहे. जेजुरीनंतर सर्वात मोठी पाच दिवसीय यात्रा ओझर गावचे ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदिर येथे भरते. याच ठिकाणी असलेल्या मोकळ्या पटांगणात मोठमोेठे पाळणे, मनोरंजानाचे खेळाचे स्टॉल लागतात. या परिसरात शाळा व कृषी समिती असल्याने येथे नेहमी वाहतूककोंडी होते. मात्र येत्या काळात वाहतुकीचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच नाशिक शहराची कनेक्टिव्हिटीदेखील वाढणार आहे. मुख्य म्हणजे अपघातांना लगाम बसणार आहे. त्यामुळे येणारे नववर्ष उड्डाणपुलाच्या रुपात ‘अच्छे दिन’ घेऊन येण्यार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पिंपळगाव येथील अपूर्ण असलेला उड्डाणपूलदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल या ठिकाणी ईपीसी २ अंतर्गत २.३ किमीचा उड्डाणपूल होणार आहे. यामुळे सध्याच्या स्थितीत बळ्यादेव मंदिर, जत्रा हॉटेल, अमृतधाम या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
अंतिम मंजुरी : ओझर परिसरातील वाहतूककोंडी सुटणार महामार्गावर तीन उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:47 PM