शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

एका शववाहिकेतून तीन मृतदेहांचा अंतिम प्रवास

By अझहर शेख | Published: April 22, 2021 2:07 AM

जुने नाशिकमधील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची रांग होती, तर दुपारनंतर शववाहिकांच्या फेऱ्या रुग्णालय ते अमरधाम अशा सुरू झाल्या. दोन ते तीन रुग्णवाहिकांमधून मृतदेहांचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णवाहिकेत तीन मृतदेह ठेवून वाहतूक करण्याचा बाका प्रसंग यावेळी मनपा प्रशासनावर ओढावला. 

ठळक मुद्देहृदय पिळवटून टाकणारे दृश्य  शववाहिकांच्या अमरधामच्या दिशेने सतत फेऱ्या

नाशिक : जुने नाशिकमधील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची रांग होती, तर दुपारनंतर शववाहिकांच्या फेऱ्या रुग्णालय ते अमरधाम अशा सुरू झाल्या. दोन ते तीन रुग्णवाहिकांमधून मृतदेहांचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णवाहिकेत तीन मृतदेह ठेवून वाहतूक करण्याचा बाका प्रसंग यावेळी मनपा प्रशासनावर ओढावला. रुग्णवाहिकाही अपुऱ्यादुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी तत्काळ रुग्णांना अन्यत्र हलविण्यास सुरुवात केली. यासाठी काही रुग्णांना शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकल्या नाही. मनपाच्या वतीने चार रुग्णांना बिटको रुग्णालयात तर एका रुग्णाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.मन सुन्न करणारा टाहोदोन ते तीन रुग्णवाहिकांमधून दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह वाहून नेताना त्यांच्या नातेवाइकांकडून फोडण्यात येणारा टाहो हा मन सुन्न करणारा होता. एकापाठोपाठ एक रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल होत होती. मृतांची ओळख पटवून त्यात मृतदेह ठेवण्यात येत होते.गोरगरीब कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या या भीषण दुर्घटनेत निष्पाप २२ जिवांचे प्राण गेले. ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागली. रुग्णालयात खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने कमी होऊ लागला. ऑक्सिजन पुरवठ्याचा पुरेसा दाब मिळू न शकल्यामुळे रुग्णालयातील कोविड वॉर्डात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा श्वास गुदमरायला लागला. त्यांची तडफड बघून नातेवाइकांचा जिवाची घालमेल सुरू झाली. n     नातेवाइकांनी आपल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे तळपाय, तळहात चोळण्यास सुरुवात केली तर काहींनी त्यांची छाती चोळली तर अनेकांची छाती दाबून (सीपीआर) श्वास थांबणार नाही, याचा प्रयत्नही केला; मात्र अनेकांचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि काळाने कोणाची आजी, कोणाचा पती, तर कोणाचा भाऊ-बहीण त्यांच्यापासून कायमचे हिरावून नेले. यावेळी नातेवाइकांनी फोडलेला टाहो अन् आक्रोश रुग्णालयाच्या भिंतींसह शासकीय, प्रशासकीय यंत्रणेलाही हादरवून सोडणारा होता. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDeathमृत्यूAccidentअपघात