शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अखेर अधिकारी नियुक्त

By admin | Published: August 14, 2014 9:55 PM

अखेर अधिकारी नियुक्त

सिडको : सिडको भागातील वाढते अतिक्रमण, प्रकल्पग्रस्तांच्या जागेचा मोबदला याबरोबरच सहावी योजना हस्तांतरण करण्यासाठी सिडको प्रशासकीय कार्यालयाने एका स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.सिडकोने गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आर्थिक तडजोड करीत ताब्यात घेतल्या व त्या जागेवर कमी व उच्च उत्पन्न गट यांच्यासाठी घरे बांधली. सर्वसामान्यांनाही हक्काचे निवासस्थान असावे, हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवत सिडको प्रशासनाने एक ते सहा योजनांची टप्प्याटप्प्याने उभारणी केली. आजमितीला सहा योजनांपैकी एक ते पाच योजना या सिडकोने महापालिकेकडे हस्तांतरण केल्या आहेत. परंतु पाचही योजनांकडील बांधकाम परवानगी, घर हस्तांतरण ना हरकत दाखला मिळणे आदिंचे अधिकार सिडकोने त्यांच्याकडेच राखून ठेवले आहेत. सध्या सिडकोच्या मूळ घराच्या मागील बाजूस तसेच मूळ घराच्या वर बांधकाम करण्यास सिडकोकडून परवानगी दिली जाते. आज सिडकोच्याच मूळ घरावर व आजूबाजूच्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. अर्थात नागरिकांनी अतिक्रमण केले असले तरी ते काढण्याची जबाबदारीही सिडको प्रशासनाचीच आहे; परंतु सिडको प्रशासनाकडे स्वतंत्र असे अतिक्रमण पथक असून नसल्यासारखेच आहे. यामुळे संपूर्ण सिडकोच अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सिडको वसाहत स्थापन झाली. परंतु प्रकल्पग्रस्तांना अद्याप त्यांच्या जागेचा पूर्ण मोबदला मिळालेला नाही. यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. हे प्रश्नदेखील सुटणे गरजेचे आहे. सदर प्रश्न मार्गी लागावे यासाठी सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर (नवीन शहरे) यांनी नाशिकच्या सिडको प्रशासकीय कार्यालयात गेल्या सोमवारपासून संजय निपाणी या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. (वार्ताहर)