उमराणे : चणकापुर झाडी एरंडगाव उजव्या कालव्याचे पुरपाणी उमराणे येथील परसुल धरणात पोहचले असुन आमदार राहुल अहेर यांच्या हस्ते पाणीपुजन पुजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून चणकापुरचे पाणी झाडी एरंडगाव धरणात पडावे यासाठी तालुक्याच्या पुर्व भागातील जनता आतुर आहे.परंतु हा कालवा अद्यापही अपुर्णावस्थेत असल्याने कालवा पुर्णत्वाच्या कामासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. सदर कालव्याचे काम उमराणे येथील ब्रिटिशकालीन परसुल धरणापर्यंत पुर्ण झाले असल्याने चणकापुर कालव्यांतर्गत रामेश्वर धरणातून परसुल धरण भरण्यासाठी पाणी मिळावे यासाठी उमराणेसह परिसरातील नागरिकांनी लढा उभारु न राहुल अहेर यांचेकडे धरण भरु न देण्यासाठीची मागणी शिष्टमंडळाने केली होती. त्या अनुशंगाने अहेर यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधुन उमराणे येथील परसुल धरणात पाणी पोहचिवण्याच्या सुचना केल्या होत्या. प्रगतशिल शेतकरी संजय भिका देवरे व ग्रामस्थांच्या वतीने अहेर यांचा सत्कार करण्यात आला. पाणीपुजनाआधी झालेल्या बैठकीत परसुल धरण भरु न देण्यासह वहनक्षमता,कालव्याला ठिकठिकाणी नविन गेट बसविणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी प्रशांत देवरे, धर्मा देवरे,यशवंत शिरसाठ, नंदन देवरे, कैलास देवरे, राजेंद्र देवरे, केदा शिरसाठ, दादा जाधव, राजु संतकृपा, मनेश ब्राम्हणकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, प्रशांत देवरे, यशवंत शिरसाठ, धर्मा देवरे, विलास देवरे, राजेंद्र देवरे, नंदन देवरे, पंडीत देवरे, दिलीप देवरे, कैलास देवरे,सचिन देवरे,सुभाष देवरे, संदिप देवरे, भरत देवरे, प्रमोद देवरे, बाळासाहेब देवरे, महेंद्र पाटील, बाळासाहेब अहेर, दत्तु देवरे,रमेश देवरे,अरु ण पाटील, दहिवडचे सरपंच आदिनाथ ठाकुर,आदिंसह उमराणे, सांगवी, कुंभार्डे, तिसगाव, दहिवड, चिंचवे आदी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. @ ब्रिटिशकालीन परसुल धरणावर उमराणेसह तिसगाव, दिहवड आदी गावासांठी पेयजल योजना असल्याने चणकापुर कालव्याचे पाणी जास्तीत जास्त उपलब्ध झाल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
अखेर चणकापुरचे पाणी परसुल धरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:51 PM