शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

अखेर काँग्रेस आमदार खोसकर ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:55 AM

राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रुपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेत आलेले नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळनंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र आमदार जयपूरला गेल्याचा खुलासा करण्यात येत आहे.

नाशिक : राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रुपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेत आलेले नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळनंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र आमदार जयपूरला गेल्याचा खुलासा करण्यात येत आहे.राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू असून, त्यात शिवसेनेला मात देण्यासाठी कॉँग्रेस व अन्य पक्षांच्या आमदारांना फोडून सत्तास्थापनेचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. याच प्रयत्नात इगतपुरीतून कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्याा नवनिर्वाचित हिरामण खोसकर यांनाही आॅफर देण्यात आल्याचे बोलले गेले. गुरुवारी (दि.७) त्यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता प्रारंभी असे काहीही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रात्रीत पुन्हा काय झाले हे स्पष्ट झाले नसले तरी खोसकर यांनी मात्र मध्यस्थांमार्फत आपल्याशी संपर्क साधून मुंबईला भेटीस बोलविल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.यानंतर शुक्रवारी (दि. ८) सकाळपासून खोसकर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल असून, त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्रखोसकर हे जयपूरला गेल्याचे सांगितले.आमदारांना धाकदपटशा किंवा आमिष दाखवून फोडले जाण्याची भीती लक्षात घेता कॉँग्रेसतर्फे सर्व आमदारांना जयपूर येथे हलविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याच अंतर्गत खोसकर हेदेखील नाशिकमधून मुंबईला रवाना झाले असून, तेथून जयपूरला जाणार असल्याचे समजते.‘गद्दारी अशक्यच’जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले खोसकर ऐनवेळी तिकिटासाठी राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आहेत. कॉँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या निर्मला गावित यांचा त्यांनी पराभव केला. आपण कॉँग्रेसशीच एकनिष्ठ असून, पक्ष बदलण्याचा किंवा गद्दारी करण्याचा किंचितही विचार करू शकत नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसMLAआमदार