महाराष्टÑ निवडणूक २०१९: अखेर कॉँंग्रेस आमदार खोसकर नॉट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:10 PM2019-11-08T13:10:14+5:302019-11-08T13:21:56+5:30
नाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र आमदार जयपुरला गेल्याचा खुलासा करण्यात येत आहे.
नाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र आमदार जयपुरला गेल्याचा खुलासा करण्यात येत आहे.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू असून त्यात शिवसेनेला मात देण्यासाठी कॉँग्रेस व अन्य पक्षांच्या आमदारांना फोडून सत्तास्थापनेचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. याच प्रयत्नात इगतपुरीतून कॉँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्याा नवनिर्वाचीत हिरामण खोसकर यांनाही आॅफर देण्यात आल्याचे बोलले गेले. गुरूवारी (दि.७) त्यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता प्रारंभी असे काहीही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रात्रीत पुन्हा काय झाले हे स्पष्ट झाले नसले तरी खोसकर यांनी मात्र मध्यस्थांमार्फत आपल्याशी संपर्क साधून मुंबईला भेटीस बोलविल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
यानंतर शुक्रवारी (दि.८) सकाळपासून खोसकर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल असून त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र खोसकर हे जयपुरला गेल्याचे सांगितले. आमदारांना धाकदपटशा किंवा अमिष दाखवून फोडले जाण्याची भीती लक्षात घेता कॉँग्रेसतर्फे सर्व आमदारांना जयपुर येथे हलविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याच अंतर्गत खोसकर हे देखील नाशिकमधून मुंबईला रवाना झाले असून तेथून जयपुरला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले खोसकर ऐनवेळी तिकीटासाठी राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आहेत. कॉँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या निर्मला गावित यांचा त्यांनी पराभव केला. आपण कॉँग्रेसशीच एकनिष्ठ असून पक्ष बदलण्याचा किंवा गद्दारी करण्याचा किंचीतही विचार करू शकत नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.